सांगोला -महुद रेल्वे गेट क्र- ३१ ब वर काँक्रिटीकरण सुरू; एकेरी मार्गामुळे वाहतुकीची झाली कोंडी
सांगोला : सोलापूर मध्य रेल्वे विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना अगर जाहीर प्रसिद्धीकरण न करता पंढरपूर - सांगोला रेल्वे लाईन वरील महूद रेल्वे गेट क्र- ३१ ब याठिकाणी गेटच्या दुतर्फा काँक्रिटीकरण काम सुरू केली आहे.
अचानक रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे गेटवर वाहतुकीची सतत कोंडी होत असून, वाहनधारक, पादचारी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पंढरपूर-मिरज रेल्वे लाईन वरील सांगोला महूद गेट क्रमांक ३१ (ब) या ठिकाणी गेटच्या दुतर्फा रस्ता काँक्रिटीकरणाला
तडे गेल्याने मोठमोठे खड़े पडले होते. पावसामुळे खड्यात पाणी साचल्यामुळे दुचाकी, चार चाकी वाहनधारकांना कसरत करून
वाहने चालवावी लागत होती तर उपनगरांतील पादचारी महिला, नागरिक यांनाही त्रास होत होता अशातच आता पुढे पावसाळा सुरू होत
असल्यामुळे सोलापूर मध्यरेल्वे विभागाकडून गेटच्या दुतर्फा रस्ता काँक्रीटीकरण काम हाती घेतले आहे.ठेकेदाराकडून गेटच्या एक बाजूला रस्ता खोदून ठेवल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.
त्यामुळे गेटवर दुचाकी चारचाकी वाहनांची गर्दी होऊन कोंडी होत आहे. हे काम येत्या ४ ते ५ जूनपर्यंत चालणार असल्यामुळे अकलूज, एखतपूर शिरभावीकडून येणा- जाणारी वाहने तसेच मस्के कॉलनी, पुजारवाडी,
महद रोड, चिंचोली रोडसह उपनगरांतील नागरिकांना दुरुस्तीच्या कामाचा त्रास सहन करावा लागणार आहे. सोलापूर मध्य रेल्वे विभागाकडून सांगोला पोलिस स्टेशन,
तहसीलदार सांगोला, मुख्याधिकारी सांगोला यांना तसे लेखी पत्र दिल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत मात्र सदर कामाविषयी सांगोला शहरवासीय अनभिज्ञ आहेत.
महुद रेल्वे गेट एकमेव मार्ग
सांगोला शहरात येण्या-जाण्यासाठी माळवाडी रेल्वे पुलाखालून बायपास रोड आहे. परंतु, बायपास रोडचे काँक्रिटीकरण काम चालू असून,
याच रोडवरून भुयारी गटारी योजनेचे काम चालू आहे. त्यामुळे सांगोला शहरात येण्यासाठी सध्या महूद रेल्वे गेटमधूनच येण्या-जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे.
त्याही ठिकाणी मध्य रेल्वे कडून दुरुस्तीचे काम सुरू केल्यामुळे चार चाकी, दुचाकी पादचारी नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे.
0 Comments