खळबळजनक..आई,पत्नी आणि तीन मुलांना संपवून स्वत: केली आत्महत्या
उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीने कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
आरोपीने घरात आई, पत्नी आणि तीन मुलांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत: गोळी झाडून आयुष्य संपवले. या हत्याकांड प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला आईवर गोळी झाडली. त्यानंतर पत्नीवर हातोड्याने वार केले आणि अल्पवयीन मुलांना टेरेसवरून फेकले.
ही घटना रामपूर मथुरा पोलिस स्टेशनच्या पाल्हापूर गावात घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच,
घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केले. आरोपी 45 वर्षीय अनुराग सिंह हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी सील करण्यात आले आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत.
आरोपीची आई सावित्री देवी (65), पत्नी (40), मुलांचे वय 6, 9, आणि 12 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये शोक पसरला आहे.

0 Comments