सांगोलकर शिववस्ती ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कारचा इशारा तहसीलदारांना दिले निवेदन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): पिण्याच्या पाण्याची टंचाई, विकास कामांचा निकृष्ट दर्जा यामुळे तिप्पेहळळी येथील सांगोलकर- शिववस्ती
ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा तहसीलदार सांगोला यांचेकडे निवेदनाव्दारे दिला आहे.
तिप्पेहळळी परिसरातील शिववस्ती व सांगोलकर वस्तीवरील टेंभू योजनेची पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सांगोलकर वस्ती तलाव,
शिव वस्ती टेंभूच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने दोन्ही वस्तीवरील ग्रामस्थांसाठी पिण्याचे पाण्याच्या व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे पाणीटंचाई व विकास कामांचा निकृष्ट दर्जा यासंदर्भात ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्यास तयार नाहीत.
येत्या चार दिवसात या गंभीर प्रश्नाचे प्रशासनाने दखल घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा अन्यथा सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक मतदानावर या दोन्ही वस्तीवरील ग्रामस्थ बहिष्कार घालणार
असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा आशयाचे निवेदन सांगोलकर व शिववस्तीवरील ग्रामस्थांनी सांगोला तहसीलदार यांना गुरुवारी दिले आहे.
0 Comments