खळबळजनक! चेष्टा मस्करीतून तालमीत मारहाण पैलवानाच्या डोक्यात पैलवानांनीच घातला रॉड; सांगोला तालुक्यातील घटना...
सांगोला:- चेष्टा मस्करीतून झालेल्या वादाचा राग मनात धरून कुस्ती शिकणाऱ्या चौघांनी मिळून पैलवान तरुणाला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्यापैकी एकाने डोक्यात लोखंडी रॉड मारून
कुस्ती शिकणाऱ्या पैलवान तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना २३ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खवासपूर (ता. सांगोला) येथील भारत भोसले यांच्या तालमीत घडली.
विकास मारुती शेंडगे (रा. खवासपूर, ता. सांगोला) यांनी फिर्यादी दिली असून, पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हा मागील दोन महिन्यांपासून खवासपूर (ता. सांगोला) येथील एका तालमीमध्ये कुस्ती शिकत असून, तेथेच राहण्यास आहे.
२२ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास फिर्यादी व तालमीतील गणेश अवताडे यांच्यात चेष्टा मस्करीतून वाद झाला होता.
दुसऱ्या दिवशी (२३ मे) रोजी सकाळी फिर्यादी तालमीमध्ये थांबला असता, गणेश अवताडे, विक्रम भोसले, विजू बोडरे व योगेश त्याठिकाणी आले
आणि फिर्यादीला शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
त्यावेळी गावातील गणेश बोडरे व आप्पा ड्रायव्हर यांनी जखमी फिर्यादीला सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
0 Comments