google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...वनविभाग सांगोला,वनक्षेत्रामधील मोठी कारवाई,मोटारसायकल एक व पिकअप एक खैर लाकुडमालासह जप्त केला

Breaking News

मोठी बातमी...वनविभाग सांगोला,वनक्षेत्रामधील मोठी कारवाई,मोटारसायकल एक व पिकअप एक खैर लाकुडमालासह जप्त केला

मोठी बातमी...वनविभाग सांगोला,वनक्षेत्रामधील मोठी कारवाई,मोटारसायकल एक व पिकअप एक खैर लाकुडमालासह जप्त केला


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- वनपरिक्षेत्र सांगोला मध्ये वनक्षेत्र गावांत वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व इतर सर्व वनअधिकारी यांनी दिनांक 25.05.2024 रोजी रात्रीची गस्त् करीत

 असताना मौजे बागलवाडी राखीव वनक्षेत्र गट नं 272 मध्ये खैर झाडे-8 अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसून आले रात्री 3.00 वा च्या दरम्याण बागलवाडी वनक्षेत्रात आरोपीला

 पकडण्यासाठी प्रयत्न केले असता दोन आरोपी वनक्षेत्रात जागेवरच खैर लाकुड माल व लाकुड कटर ठेवून पळून गेले. ताबडतोब आरोपीचा पाठलाग करून आरोपीला मौजे

 महुद येथे वनअधिकारी सांगोला यांनी पकडले. आरोपी 1. श्री. दतात्रय शिवाजी गोडसे रा. नरळेवाडी आरेपी नं 2 श्री. मारुती विलास गळवे रा. वाकि शिवणे (ढेंबरेवस्ती) ता. सांगोला 

यांची मोटारसायकल हिरो स्प्लेंडर क्रमांक MH 45 AB 0443 मौजे महुद येथे जप्त केले. तसेच मौजे वाकि शिवणे ढेंबरे वस्ती येथे सकाळी 6.30 वा च्या

 दरम्याण श्री. शक्ती जालिंदर ढेंबरे यांचा पिकअप क्रमांक MH 45 AF 9539 घराजवळ तपासणी केला असता खैर लाकुड नग 15 पिकअपमध्ये मिळून आले .

 खैर लाकुडमालासह पिकअप जप्त केला आहे. तसेच बागलवाडी व कटफळ येथील खैर माल जप्त केला आहे.

 व लाकुड कटर जप्त केला आहे. तसेच वरील आरोपी दोन यांनी त्याच्या जबाबमध्ये लिहुन दिले आहे की, सदर पिकअपमध्ये खैर मालाची वाहतुक 

मौजे शिवणे, कटफळ, महुद बु// मंगळवेढा येथे या महिण्यात केलेली आहे. सदर पिकअप खैर मालासह पिकअप व मोटारसायकल जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय शेजारी सांगोला येथे ठेवले. 

वनरक्षक अचकदाणी यांचा प्रथम गुन्हा क्रमांक C1- 2024-25 दिनांक 25.05.2024 नुसार नोंद केला आहे. सदर वनगुन्हे प्रकरणे वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर तपास करीत आहेत. 

वरील दोन आरोपींना सांगोला येथे न्यायालयात हजर केले असता. मा. प्रथम न्यायदंडाधिकारी सांगोला यांनी आरोपींना 30 मे 2024 पर्यंत फॉरेस्ट कस्टडी (FCR) दिलेला आहे. 

सदर प्रकरणी पुढील तपास चालु आहे.लोकांना अहवान करण्यात येते की, वनक्षेत्रामध्ये कोणतेही झाड तोडण्यास परवानगी नाही

 वनक्षेत्रात वृक्षतोड, चराई, वनवा, शिकार, खोदकाम, किंवा इतर प्रकारचा वनगुन्हा केल्यास गंभीर गुन्हा होतो. व कोणत्याही प्रकारचे वाहन सरकार जमा केले जाते. 

त्यामुळे लोकांनी वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा वनगुन्हा करू नये.असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम  जाधवर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments