google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाचा तपास सुरू करून,नव्याने तपास करण्याचे सीबीआय ला आदेश !

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाचा तपास सुरू करून,नव्याने तपास करण्याचे सीबीआय ला आदेश !

ब्रेकिंग न्यूज..प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाचा तपास सुरू करून,नव्याने तपास करण्याचे सीबीआय ला आदेश !


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला विशेष प्रतिनिधी ; सांगोला येथील शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाचा,

सीबीआय ने सांगोला येथील कोर्टात सादर केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत,सदर प्रकरणातील मुळ फिर्यादी यांचे म्हणणे ग्राह्य धरून,प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाचा,

पुढील तपास सुरू करून,नव्याने तपास करण्याचे आदेश सांगोला येथील मा.ज्यु. मॅजि.वर्ग-१ यांनी  सीबीआय मुंबई यांना दिले आहेत.

प्राचार्य महेश होनराव यांचा १ मार्च २०१० रोजी अज्ञात व्यक्तीने खून केला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास 

सांगोल्याचे पोलिस निरीक्षक नितीन जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला होता.पोलीस निरीक्षक नितीन जगताप हे महेश होनराव खून

 प्रकरणाचा समाधानकारक तपास करीत नसल्याची तक्रार महेश होनराव याची पत्नी रूपाली होनराव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. 

त्यानुसार,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संजय स्वामी यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली.

 स्वामी यांनी सदर प्रकरणाचा सहा महिने तपास केला. यावर मृत महेश होनराव याच्या पत्नी रूपाली यांनी तपास योग्य दिशेने होत नाही, 

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. 

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर व ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने २१ जानेवारी २०११ रोजी हा तपास सीआयडीच्या साहाय्यक अधीक्षकांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

सीआयडीचे साहाय्यक अधीक्षक सदर खून प्रकरणाचा तपास करीत नसल्याने रुपाली होनराव यांनी 

पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेत हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली.त्यावर सुनावणी होऊन सीआयडीला हवा तेवढा वेळ देण्यात आला होता. 

परंतु सीआयडी तपासात दिरंगाई करत असल्याने. सीआयडी कडून सदर खून प्रकरणाचा तपास काढून घेवून,सदर खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. 

सीबीआयनेही महेश होनराव खून प्रकरणाचा तपास केला परंतु सीबीआय ला ही या खून प्रकरणाच्या तपासात  यश प्राप्त झाले नाही.

त्यामुळे सीबीआयने सांगोला येथील मे.कोर्टात सदर खून प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.

 या क्लोजर रिपोर्टवर मे.कोर्टाने सदर खून प्रकरणातील मुळ फिर्यादी यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. 

मुळ फिर्यादी यांनी म्हणणे देवून सदरचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार द्यावा अशी विनंती मे.कोर्टास केली होती.

सदर प्रकरणातील मुळ फिर्यादी यांचे म्हणणे ग्राह्य धरून,प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणाचा,पुढील तपास सुरू करून,नव्याने तपास करण्याचे आदेश

  मा.ज्यु. मॅजि.वर्ग-१ सांगोला यांनी  सीबीआय मुंबई यांना दिले आहेत.त्यामुळे तब्बल १४ वर्षानंतर प्राचार्य महेश होनराव खून प्रकरणात नवा  ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments