google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..विद्यार्थ्याकडून निवृत्त शिक्षकाची 12.50 लाख रूपयांची फसवणूक ! पैसे मागितल्यास तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकी

Breaking News

खळबळजनक..विद्यार्थ्याकडून निवृत्त शिक्षकाची 12.50 लाख रूपयांची फसवणूक ! पैसे मागितल्यास तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकी

खळबळजनक..विद्यार्थ्याकडून निवृत्त शिक्षकाची 12.50 लाख रूपयांची फसवणूक ! पैसे


मागितल्यास तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकी

सोलापूर : पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षक असताना विद्यार्थी म्हणून शिकलेल्या सोहेल हजरत खान पटेल 

(रा. कांदा बाझार, अक्कलकोट) याने आपल्याच सेवानिवृत्त शिक्षकाला साडेबारा लाख रुपयाला टोपी घातली आहे.

या प्रकरणी निवृत्त शिक्षक सलीम शमशुद्दीन वळसंगकर (वय ६८, रा. रमाकांत कर्णिक नगर, पावन गणपतीजवळ) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी निवृत्त शिक्षक सलीम शमशुद्दीन वळसंगकर (वय ६८, रा. रमाकांत कर्णिक नगर, पावन गणपतीजवळ) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

निवृत्त शिक्षक सलीम वळसंगकर यांच्या घरी २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोहेल पटेल आला. त्यावेळी त्याने मी आपलाच विद्यार्थी अशी ओळख करून दिली. 

आपण ॲमेझॉन इंटरनॅशनल कंपनी व भारत पे नॅशनल कंपनीत गुंतवणूकदार म्हणून काम करतोय,

 असे सांगून स्वत:चे ओळखपत्र त्यांना दाखवले. त्यातून त्याने सुरवातीला निवृत्त शिक्षकाचा विश्वास संपादित केला. तुम्ही जर कंपनीत अडीच लाख रुपये गुंतवले, 

तर एका वर्षात तीन लाख ६५ हजार रुपये मिळतील, असे आमिष सोहेलने दाखविले. पहिल्यांदा गुंतवलेल्या रकमेचा परतावा त्याने काही दिवसांतच केला. 

त्यामुळे फिर्यादी निवृत्त शिक्षक सलीम वळसंगकर यांचा आणखी विश्वास बसला. त्यानंतर त्याने हळूहळू करून आपल्याच निवृत्त शिक्षकाकडून १२ लाख ५० हजार रुपये काढले. 

त्याचा परतावा मिळाला नसल्याने फिर्यादी सलीम वळसंगकर यांनी सोहेलशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

'मला बीपीचा त्रास आहे, तुम्ही जर मला परत पैसे मागितले तर तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन' अशी धमकी त्याने दिली.

 त्यानंतर सलीम वळसंगकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. 

या प्रकरणी संशयित आरोपी सोहेल पटेल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक विजय बनसुडे तपास करीत आहेत.

सेवानिवृत्तीचा फंड, दागिने मोडून दिले पैसे

फिर्यादी सलीम वळसंगकर यांना तीन मुले असून तेही उच्चशिक्षित आहेत. पण, सोहेल पटेल याने दाखविलेले आमिष, त्याची स्कीम याबद्दल मुलांना काहीही कळू दिले नाही.

 ज्यावेळी सोहेल पैसे परत देत नसल्याचे लक्षात आले, त्यावेळी फिर्यादीने मुलांना हकिगत सांगितली. दरम्यान, सुरवातीला सोहेलने अडीच लाख गुंतवल्यावर काही परतावा दिला. 

पुन्हा अधिकची रक्कम गुंतविण्यासाठी निवृत्तीवेळी मिळालेली रक्कम, दागिन्यांचे काही पैसे, असे मिळून साडेबारा लाख रुपये सोहेलकडे गुंतवले.

 तत्पूर्वी, पाच जणांची गुंतवणूक करायचे ठरल्याने सोहेलने परताव्यापोटी दिलेल्या रकमेसह आणखी काही रक्कम घेतली, असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

Post a Comment

0 Comments