शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी.
सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
सांगोला शहरातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले यांची 197 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या स्टेशन रोड येथील मुख्य कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कर सल्लागार
रमेश बनकर व युवा नेते मधुकर बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सांगोला शहरातील महात्मा फुले जयंती युवाप्रेमी मंडळ यांचे सदस्य व पदाधिकारी यांनी महात्मा फुले यांच्या
प्रतिमेस फुले वाहून अभिवादन केले . यावेळी महात्मा फुले जयंती उत्सव मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते .
प्रास्ताविक प्रा. प्रसाद खडतरे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहीद अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले .
0 Comments