कोळे येथे रमजान ईद उत्साहात साजरी...!
कोळे/ प्रतिनिधि (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
इस्लाम हा शांतता पूर्ण धर्म आहे. पवित्र अश्या रमजान महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर रोजा (उपवास) पकडुन देवाची उपासना व प्रार्थना मनोभावे केली जाते
कोळे ता.सांगोला येथील ईदगाह मैदान वर रमजान ईद ची नमाज पठण करण्यात आली.
कोळे,गौडवाडी,किडेबिसरी,पाचेगाव बुद्रुक, व कामानिमित्त आलेले कलकत्ता व बिहार या ठिकाणी चे सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनकडून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. सांगोला तालुक्यातील शहरी भागांसह इतरत्र ग्रामीण भागात
रमजान ईद हि मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी सांगोला पोलिस स्टेशनकडून बंदोबस्त होता.
यावेळी पोलिस अधिकारी सचिन वाघ, होमगार्ड दगडू आलदर कोळे गावचे पोलिस पाटील प्रविण हातेकर हे सदर च्या ठिकाणी उपस्थित होते.
त्यांचेकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व या पुढे ही असेच मोलाचे सहकार्य करा असे सांगण्यात आले.यावेळी आलम मुलाणी, महिबुब आतार,
सत्तार मणेर,अझर खाटिक, डॉ. सादिक पटेल, अँड जुबेर तांबोळी,समीर मुलाणी, अकीब पटेल, पैगंबर मुलाणी, सोहेल तांबोळी, जावेद तांबोळी, जलाल पटेल आदी सर्व मुस्लिम बांधव मोठया संख्येने रमजान ईद उपस्थित होते.
0 Comments