google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! सोलापूर जिल्ह्यासाठी आज अन् उद्या हवामान विभागाने दिला यलो अलर्ट; घराबाहेर पडण्याआधी 'ही' बातमी वाचाच

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर जिल्ह्यासाठी आज अन् उद्या हवामान विभागाने दिला यलो अलर्ट; घराबाहेर पडण्याआधी 'ही' बातमी वाचाच

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर जिल्ह्यासाठी आज अन् उद्या हवामान विभागाने


दिला यलो अलर्ट; घराबाहेर पडण्याआधी 'ही' बातमी वाचाच 

सतत वाढणाऱ्या तापमानाने आता दोन दिवस तरी माघार घेतली आहे. आज गुरुवाती व उद्या शुक्रवारी देखील पावसाची शक्यता आहे.

 त्यामुळे या दोन दिवसांत तापमान कमी होण्याचा हवामान अंदाज विभागाने वर्तविला आहे. बुधवार १० एप्रिल रोजी कमाल पारा ४० अंश सेल्सिअसवर थांबला.

मंगळवार १० एप्रिल रोजी कमाल तापमान हे ४०.२ तर, किमान तापमान हे २८.१ अंश सेल्सिअस इतके होते. पाऊस पडल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.

बुधवार १० एप्रिल रोजी कमाल तापमान हे ४० अंश सेल्सिअस तर, किमान तापमान हे २७.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. बुधवारी तापमानात काहीशी घट झाली तरी उकाडा कायम होता.

पाऊस पडल्यानंतर काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सकाळीदेखील गारवा कायम होता.

हवामान विभागाचा यलो अलर्ट

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर, देशाच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

 येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हा अलर्ट ११ व १२ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे या दोन दिवसांत जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यानंतर मात्र, उकाडा जाणवू लागला. पावसाची शक्यता असेपर्यंत हा उकाडा कायम असण्याची शक्यता आहे. तापमानात घट झाली असली तरी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

 असल्यामुळे नागरिक घामाघूम होणार आहेत. शनिवार १३ एप्रिल रोजी मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments