google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी; बुद्धेहाळ तलावात दुर्मिळ ऑस्प्रेचे दर्शन

Breaking News

सांगोला पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी; बुद्धेहाळ तलावात दुर्मिळ ऑस्प्रेचे दर्शन

 सांगोला पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी; बुद्धेहाळ तलावात दुर्मिळ ऑस्प्रेचे दर्शन


शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

सांगोला - बुद्धेहाळ तलाव (ता. सांगोला) येथे ऐन उन्हाळ्यात दुर्मिळ ऑस्प्रे म्हणजेच कैकर (मासेमार) या दुर्मिळ प्रजातींच्या पक्षाचे दर्शन झाले आहे.

 ऑस्प्रे हा पक्षी अंटार्टिका प्रदेश वगळता जगाच्या प्रत्येक भागामध्ये सापडतो.हे पक्षी अमेरिका, चीन, मंगोलिया, सायबेरिया, आफ्रिका या देशांमधून 

भारतामध्ये स्थलांतर करून येतात. भारत, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स या देशांमध्ये हिवाळी परदेशी पाहुणा अशी या पक्षाची ओळख आहे.

तालुक्यातील विविध तलाव, पाणथळीची ठिकाणे व जलाशय इत्यादी ठिकाणांवर विविध परदेशी पक्षी दाखल झालेले आहेत. 

एप्रिल महिन्याच्या ऐन कडक उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील तलाव पाणवठे, विहिरी व जलाशयांची पातळी खालावलेली

 असताना देखील तालुक्याच्या व सांगली जिल्ह्याच्या सीमा भागातील बुद्धेहाळ तलाव येथे पाण्याची पातळी तुलनात्मकदृष्ट्या चांगली आहे.

पक्षी अभ्यासक डॉ. प्रकाश बनसोडे बुद्धेहाळ तलाव येथे पक्षी निरीक्षणास गेले असता, त्यांना ऑस्प्रे 

म्हणजेच कैकर किंवा मासेमार या दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाचे दर्शन झाले. ऑस्प्रे हा पक्षी अंटार्टिका प्रदेश वगळता जगाच्या प्रत्येक भागामध्ये सापडतो. 

हे पक्षी अमेरिका चीन मंगोलिया सायबेरिया आफ्रिका या देशांमधून भारतामध्ये स्थलांतर करून येतात.

भारत, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स या देशांमध्ये हिवाळी परदेशी पाहुणा अशी या पक्षाची ओळख आहे.

 हा स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध पक्षी असून, तो आकाराने घार, गरुड व ससाणा यांच्या आकाराचा असतो.

 हे पक्षी मोठे जलाशय नदी सरोवरे व समुद्र अशा ठिकाणी आढळतात.

 यांचे मुख्य अन्न हे मासे असून ते पाण्याच्या पृष्ठभागावरून उडत राहून सूर मारून मासा पकडण्यामध्ये पारंगत असतात.

या पक्षाचे वजन १ हजार २०० ते २ हजार ग्रॅम इतके असते. शरीराचा रंग तपकिरी चमकतात व माने व पायाजवळ पांढरा असतो.

 चोच व नखे अत्यंत तीक्ष्ण असतात. हे पक्षी मोठ्या जलाशयाजवळील उंच झाडावर घरटी करून राहतात. मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. 

मादी तीन ते चार अंडी घालते. नर व मादी मिळून अंडी उबवितात व दोघेही शिकार करून पिलांचे पोषण करतात.

ऑस्प्रेला माशांची शिकार करताना पाहणे हे अत्यंत विलोभनीय व मनमोहक दृश्य आहे 

असे मत पक्ष अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी व्यक्त केले. बुद्धेहाळ तलाव व परिसर हा शांत व निसर्गरम्य भाग असून 

येथे अनेक दुर्मिळ पक्षी दाखल झाले आहेत म्हणून पक्षीप्रेमी निसर्ग प्रेमी मोठ्या संख्येने बुद्धेहाळ तलावाकडे आकर्षित होत आहेत.

बुद्धेहाळ तलाव परिसरात ऑस्प्रे म्हणजेच कैकर या दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाचे दर्शन झाले आहे. 

हा परिसर शांत व मनमोहक असल्यामुळे अनेक परदेशी पाहुणे ऐन उन्हाळ्यातही या ठिकाणी वास्तव्यात येत असतात. 

ऑस्प्रे या पक्षाला माशांची शिकार करताना पाहणे हे अत्यंत विलोभनीय व मनमोहक दृश्य असते

- प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, पक्षी निरीक्षक, सांगोला.

बुद्धेहाळ तलाव परिसर वन्यजीवांसाठी माहेरघर

बुद्धेहाळ तलावाचे बांधकाम ब्रिटिशांनी १९०२ साली केल्याचा इतिहास आहे. तलावाची उर्वरित काम १९५७ मध्ये पूर्ण करण्यात आले. 

सांगोला व आटपाडी या तालुक्यांना पाणीपुरवठा व्हावा या हेतूने बुद्धेहाळ तलावाचे बांधकाम करण्यात आले. 

या तलावास शुक्राचार्य व सांगली जिल्ह्यातील पर्वतरांगांमधून वाहून आलेल्या पाणलोट क्षेत्राचा फायदा होतो.

१ हजार १०० दशलक्ष घन लिटरहून अधिक इतकी विशाल साठवण क्षमता असणारा हा तलाव व परिसर येथील निसर्ग,

 उंच झाडे, तलावाची तटबंदी, ब्रिटिशकालीन बांधकाम असलेला बंगला (गेस्ट हाऊस) यामुळे शेकडो पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर आहे.

बुद्धेहाळ तलाव परिसरात आढळणारे परदेशी पक्षी

ओस्प्रे

भुवई बदके

चक्रवाक बदक/ब्राह्मणी बदक

पट्टकादंब/परदेशी राजहंस

समुद्री ससाणा/नदी ससाणा

Post a Comment

0 Comments