दुर्दैवी घटना.. कृषी साहित्य दुकानांच्या उद्घाटनाला गेले पत्नीने विहिरीत केली आत्महत्या सांगोला तालुक्यातील घटना
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : घरचे लोक गुढीपाडव्यानिमित्त नव्याने थाटलेल्या कृषी साहित्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला जाताच पत्नीने विहिरीत उडी ठोकून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
प्रियांका आदिनाथ नरळे (वय २५, रा. लक्ष्मीनगर, ता सांगोला) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून ही घटना मंगळवार, ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली.
याबाबत पती आदिनाथ जयाप्पा नरळे यांनी पोलिसात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ नरळे यांची पत्नी प्रियांका व सासू मालन आटपाडकर
वगळता कुटुंबातील सर्वजण मंगळवारी सकाळी ८ वाजता गुढीपाडव्यानिमित्त कृषी साहित्याच्या नवीन दुकानाचे उद्घाटन करावयाचे असल्याने लक्ष्मीनगर गावात गेले होते.
0 Comments