खळबळजनक ..सांगोला शहरात सात जणांचा दरोडा टाकण्याचा प्लॅन;
दोन कारसह तलवार अन् कोयता जप्त एकास पकडले : सहा जण अंधाराचा फायदा घेऊन गेले पळून
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सात जणांच्या टोळीकडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दोन कारमधून लोखंडी तलवार, लोखंडी गज, लाल तिखट, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कोयता,
लाकडी दांडके अशा दरोड्याच्या साहित्यासह एकास चाकूसह रंगेहाथ पकडले, तर सहा जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले,
यावेळी पोलिसांनी दोन कारसह वरील दरोड्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई मंगळवार, १ एप्रिल रोजी पहाटे ३:३० च्या सुमारास वंदे मातरम् चौक, सांगोला येथे केली.
याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल तुकाराम व्हरे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सचिन प्रकाश इंगोले (वय २०, रा. बामणी), नवनाथ भोसले,
अनिकेत बापूराव काळे, गणेश शरद काळे, साहील चव्हाण, नवनाथ भोसले व इतर एकजण, अशा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
यातील सचिन प्रकाश इंगोले यास अटक केल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.
जगताप, पोलिस फौजदार पुजारी पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर, पोलिस नाईक नागनाथ
वाकीटोळ, पोलिस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी, कुंभार, पांढरे असे मिळून सोमवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास सांगोला पोलिस स्टेशन हद्दीत रात्रगस्त व आरोपी शोधाकरिता पेट्रोलिंग करीत होते.
चौकट
संशयास्पद थांबल्याचे दिसल्याने कारवाई..
वंदे मातरम् चौक, सांगोला येथे काही इसम त्यांच्या चारचाकी पांढऱ्या व काळ्या रंगाच्या कारमधून दरोडा टाकण्याच्या तयारीने येऊन थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्याआधारे पोलिसांनी मंगळवारी पहाटे ३:३० च्या सुमारास वंदे मातरम् चौक बायपास रोडच्या बाजूस संजयनगर झोपडपट्टीलगत सदरच्या दोन कार संशयास्पद थांबल्याचे दिसल्या. पोलिसांनी एचएच ४५-एक्यू ८९९७ नंबरची व एक विनानंबरची कार ताब्यात घेतली
0 Comments