पूज्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई
करा हिंदू जनजागृती समितीची सांगोला येथे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (जिल्हा सोलापूर) - सांगोला येथे हिंदू जनजागृती समिती च्या वतीने बुधवार, 13 मार्च या दिवशी जिल्हाधिकारी आणि गृहमंत्री यांच्या नावे तहसीलदार यांना 2 निवेदन देण्यात आली.
यामध्ये अनेक युवकांचे मार्गदर्शक असलेले पूज्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा
मास्टरमाइंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी गजवा-ए -हिंद चा फतवा देणाऱ्या दारुल उलूम देवबंद या संघटनेवर तात्काळ बंदी
आणून तिच्या सर्व देश विरोधी कारवाया कठोरपणे मोडून काढाव्यात, या आशयाचे निवेदन देण्यात आहे. यावेळी तहसीलदार संतोष कणसे यांनी निवेदन स्वीकारून पुढे पाठवत असल्याचे सांगितले.
निवेदन देतेवेळी सर्वश्री नारायण मिसाळ, सुनील पैलवान, गणपत पटेल, अजय तेली, महेश राजमाने, डॉक्टर मानस कमलापूरकर, उमेश मंडले, महेश चौधरी, सोम खंडागळे, संतोष पाटणे आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यातील अनेक लोकांना दिशा देऊन
देव, देश, धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केलेले आहे. त्यांनी केलेल्या प्रेरणेमुळे अनेक युवक राष्ट्रधर्म रक्षणासाठी कृतीशील झालेले आहेत.
तसेच व्यसनांपासून दूर झालेले आहेत. त्यामुळे पूज्य भिडे गुरुजी हे अनेक युवकांचे प्रेरणास्थान आहेत, असे असताना पूजनीय भिडे गुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही
समाजकंटकांकडून आक्रमण करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे. मनमाड येथे 29 फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारची घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली तरी
1. या घटनेमागे जे दोषी आहेत त्यांना पकडून त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
2. या घटने पाठीमागील मास्टरमाईंड शोधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पूर्वनियोजित कट तर नाही ना याची चौकशी करावी.
3. पूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी. तसेच तहसीलदार यांना दिलेल्या दुसऱ्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी भारताचा विकास व्हावा
तसेच भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स एवढी करून जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्यासाठी झटत आहेत तर दुसरीकडे दारुल उलूम देवबंद ने गजवा-ए- हिंद म्हणजेच भारतावर आक्रमण करण्याचा फतवा काढला आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपुर येथील दारूल उलूम देवबंद ही भारतातील सर्वात मोठी इस्लामी संस्था दक्षिण एशियातील सर्व मदरशांना संचलित करते
त्यामुळे या फतव्याला खूप महत्त्व असून या फतव्याकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीरपणे पाहायला हवे तरी या
1. दारुल उलूम देवबंद या इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी.
2. त्यांच्या संलग्न असणाऱ्या सर्व संस्थांवर बंदी आणावी. 3. या फतव्याच्या मागे कोणाचे षडयंत्र आहे याचा शोध घ्यावा तसेच तपासात निष्पन्न झालेल्या माहितीच्या आधारे दोषींवर देशद्रोहाच्या गुन्हे अंतर्गत कारवाई करावी.
4. तसेच या फतव्याच्या कोणत्याही प्रकारच्या प्रसारावर बंदी आणावी जे प्रत्यक्ष वा सोशल मीडियाद्वारे या फतव्याचा प्रसार करताना आढळेल त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
0 Comments