कलबुर्गी- कोल्हापूर रेल्वेस प्रवाशांनी प्रतिसाद द्यावा:- अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी) (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोमवार 11मार्चपासून सांगोल्यात कलबुर्गी -कोल्हापूर- कलबुर्गी या एक्सप्रेस रेल्वेस रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांकरता थांबा मंजूर केला आहे.
आता सांगोला व परिसरातील प्रवाशांनी सदरचा थांबा कायमस्वरूपी टिकून राहण्याकरता परिसरातील व तालुक्यातील नागरिकांनी या रेल्वेस प्रतिसाद देणे गरजेचे आहे. रेल्वेच्या अपेक्षित उत्पन्नापेक्षा जर कमी तिकीट विक्री,
प्रवासी संख्येत घट झाली तर हा थांबा सहा महिन्यानंतर रद्द होऊ शकतो. त्याकरिता शहरवासीयांनी याबाबत अधिक जनजागृती प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यास प्रवृत्त करावे.
त्याचबरोबर कलबुर्गी -कोल्हापूर या रेल्वेने प्रवास केल्यास इच्छुकांना मिरज इथून दररोज दुपारी हरिप्रिया एक्सप्रेस( तिरुपती बालाजी )महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर -शेगाव- नागपूर)
या रेल्वेची दररोज प्रवाशांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे ,कोल्हापूर -कलबुर्गी या रेल्वेने प्रवास केल्यानंतर कुर्डूवाडी जंक्शन येथून गदग -मुंबई एक्सप्रेस ,सिद्धेश्वर एक्सप्रेस व दक्षिण भारतात
जाण्याकरता चेन्नई मेल, हैदराबाद ,कन्याकुमारी विशाखापट्टणम ,भुवनेश्वर एक्सप्रेस या ठिकाणी गरजू प्रवाशांना सहजरित्या या गाडीने दररोज जाता येणार आहे.
तरी या 22155 & 22156 कलबुर्गी -कोल्हापूर- कलबुर्गी या रेल्वेचा लाभ सांगोल्यातील अधिकाधिक प्रवाशांनी घ्यावा असे आव्हान शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments