google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चोपडी येथील सुयश शंकर बाबर यांची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर निवड

Breaking News

चोपडी येथील सुयश शंकर बाबर यांची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर निवड

 चोपडी येथील सुयश शंकर बाबर यांची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर निवड


सांगोला/ प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील चोपडी येथील सुयश शंकर बाबर यांची महाराष्ट्र सरकारच्या 

जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर दि. 3 मार्च 2024 रोजी निवड झाली आहे. पुणे विभागात  त्यांचा 4 था क्रमांक आहे.

 सुयश बाबर यांचे पाचवीपर्यंचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर , दहावीपर्यंतचे शिक्षण बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोपडी या ठिकाणी झाले. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पुणे येथे प्राप्त केली .

सन 2016 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू होता. 3 मार्च 2024 रोजी सुयश बाबर यांची सदर पदावर निवड झाली. सुयश बाबर यांचे वडील एस .बी.बाबर हे बाळासाहेब देसाई विद्यालय कनिष्ठ

 महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य असून त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे. सुयश बाबर याच्या यशात आई-वडील व  गुरुजनांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. 

Post a Comment

0 Comments