google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बाबर कुटुंबियांकडून आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार रुपये देणगी

Breaking News

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बाबर कुटुंबियांकडून आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार रुपये देणगी

 वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बाबर कुटुंबियांकडून आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार रुपये देणगी


सांगोला (प्रतिनिधी)- कु.आराध्या रामचंद्र बाबर हिच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आलेगाव ता. सांगोला येथील

 रामचंद्र बाबर व सतीश उर्फ बाळू गायकवाड यांनी मंगळवारी आपुलकी प्रतिष्ठानला ५०००/- रुपये देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

आलेगाव येथील रामचंद्र बाबर यांची सुकन्या कु. आराध्या ही उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत आहे.

 तिच्या ८ व्या वाढदिवसानिमित्त आराध्या कलेक्शनचे मालक सतिश उर्फ बाळू गायकवाड व त्यांचे मामा रामचंद्र बाबर यांनी

 आपुलकी प्रतिष्ठानच्या सुरु असलेल्या सामाजिक कार्यात आपलाही थोडा सहभाग असावा म्हणून ५ हजार रुपयांची देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, प्रमोदकाका दौंडे, अच्युत फुले, शिवदास राऊत, इंजि. विकास देशपांडे, अरविंद डोंबे, सतिश उर्फ बाळू गायकवाड, प्रशांत पगारे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments