सोलापूर जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर, प्रशासकांच्या हाती कारभार; मूलभूत सुविधांवर परिणाम
सोलापूर : जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये मुदत संपणाऱ्या ५० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करून ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरच ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या ५० ग्रामपंचायतींमधील जवळपास ४७ ग्रामपंचायतींची मुदत संपली असल्याने या गावांचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे.
जानेवारी ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती : बार्शी : लाडोळे, सुर्डी, दहिटणे, रुई, ताडसौंदाणें. मंगळवेढा : खवे, येळगी, कागस्ट, जिंती, हन्नूर, माळेवाडी, शिवणगी. पंढरपूर : लोणारवाडी, बिटरगाव,
जळोली, जाधववाडी, गार्डी, पांढरेवाडी. सांगोला : सोनंद, गळवेवाडी, बागलवाडी, सोनलवाडी राजापूर. माळशिरस : भांबुर्डी, डोंबाळवाडी कु.,
सुळेवाडी, झंजेवाडी खु,, पिलीव, कदमवाडी, जाधववाडी, हनुमानवाडी, झिंजेवस्ती पि., खुडुस, डोंबाळवाडी (खु.). अक्कलकोट : संगोगी ब., सातनदुधनी, कलाप्पावाडी, समर्थनगर,
गांधीनगर (सोळसेतांडा). माढा : उजनी टें., वेणेगाव. मोहोळ : वडदेगाव, गोटेवाडी, कोन्हेरी, लमाणतांडा. करमाळा : लव्हे, वरकुटे, भाळवणी. दक्षिण सोलापूर : आलेगाव, कुडल.
ताडसौंदणे, शिवणगी, लोणारवाडी, संगोगी, सातनदुधनी, कलप्पावाडी, वेणेगाव या ग्रामपंचायतींची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे.
उजनीची मुदत मेमध्ये तर समर्थनगरची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत आहे. मुदत संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक पूर्व तयारी करून ठेवली जाते.
लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे.
पोटनिवडणुकाही ठप्प
जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी करून ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ४८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकाही लांबणीवर पडणार आहे.
या ४८ गावांमध्ये चपळगाव, करकंब, चिकमहूद, मेडशिंगी, बुद्धेहाळ, वडापूर, भंडारकवठे, मंद्रूप या मोठ्या गावांचा समावेश आहे.
0 Comments