google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सौ.शालन काळेल यांना राज्यस्तरीय ''आदर्श माता" पुरस्कार जाहीर

Breaking News

सौ.शालन काळेल यांना राज्यस्तरीय ''आदर्श माता" पुरस्कार जाहीर

 सौ.शालन काळेल यांना राज्यस्तरीय ''आदर्श माता" पुरस्कार जाहीर


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण 

 सोलापूर येथे अविष्कार सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन संस्था कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात येणार आहे. 

या फाउंडेशनच्या निवड समितीने खिलारवाडी ता. सांगोला येथील सौ. शालन मारुती काळेल यांची राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार यासाठी निवड केली आहे.

 फाउंडेशनचे अध्यक्ष मा. संजय पवार मा.सचिन वायकुळे मा. संजय कुमार घोडके व इतर प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे .                   

सौ शालन काळेल या स्वतः अशिक्षित असून सुद्धा मोठ्या प्रमाणात काबाडकष्ट करून आपल्या तिन्ही मुलांना उच्च पदा पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आदर्श संस्कार देऊन केले आहेत. 

व एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करून ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेमध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. तसेच सामाजिक कार्यामध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेणे व आदर्श गृहिणी म्हणून त्यांना पंचक्रोशी मध्ये ओळखले जाते

. या सर्वांचा निवड समितीने विचार करून त्यांना २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श माता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments