ब्रेकिंग न्यूज..पिंपरी पोलीसांनी दोन तडीपार गुन्हेगारासह चार जणांना अटक, पिस्टल व कोयते जप्त सांगोला तालुक्यातील एकाचा समावेश...
वाकड, चिंचवड आणि पिंपरी पोलीसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये दोन तडीपार गुन्हेगारांसह चार जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून पिस्टल व कोयते जप्त केले आहेत याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.26) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाकड पोलिसांनी थेरगाव येथे दोघांना अटक करुन त्यांच्याकडून पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी माऊली उर्फ ज्ञानेश्वर सुबराव पवार (वय-23 रा. पवारनगर, थेरगाव मुळ रा. वाटंबरे ता. सांगोला) व अजय म्हस्के (रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार वंदु गिरे यांनी फिर्य़ाद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी एका तडीपार गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचा कोयता जप्त केला आहे. ही कारवाई दळवीनगर, चिंचवड येथे करण्यात आली.
विकास उर्फ विक्या अंकुश भिसे (वय-27 रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार उमेश वानखेडे यांनी फिर्य़ाद दिली आहे.
आरोपी विकास भिसे याला नोव्हेंबर 2023 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीची मुदत संपलेली नसताना तो शहराच्या हद्दीत आला होता.
पिंपरी पोलिसांनी आनंद नामदेव दनाने (वय-31 रा. विद्यानगर, चिंचवड) या तडिपार गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. आरोपी आनंद दनाने याला फेब्रुवारी 2024 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार करण्यात आले होते.
त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आनंद याला ताब्यात घेतले.
0 Comments