करमाळा, माढा आणि आता सांगोला दौरा मोहिते पाटील कधी घेणार निर्णय? निवडणूक लढवणार का? धैर्यशील मोहिते पाटलांनी थेटच सांगितलं
प्रचाराला सुरुवात झालीय. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त असल्याचं चित्र दिसत आहे. काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत तर अद्याप अनेक पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले नाहीत.
मात्र, इच्छुक तयारीला लागले आहेत. अशातच माढा लोकसभा मतदारसंघाची देखील सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
या मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज आहेत. ते देखील निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, मी सध्या लोकांची जनभावना जाणून घेत आहे. त्यानंतर मी राजकीय निर्णय घेणार असल्याचे मोहिते पाटील म्हणाले.
करमाळा, माढा आणि आता सांगोला दौरा
सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
लोकांची जनभावना जाणून घेण्यासाठी माझा दौरा सुरु असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. लोकांची जनभावना जाणून घेतल्यावरच राजकीय निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपण सध्या संपूर्ण मतदार संघात कुटुंबासह फिरुन जनतेच्या मनातील जनभावना जाणून घेत आहे. यासाठी आपण करमाळा, माढा आणि आता सांगोला दौरा करत आहे.
आपला दौरा झाल्यावर लोकांच्या जनभावनेचा विचार करून आपला पुढील निर्णय होईल. दरम्यान, यावेळी रामराजे नाईक निंबाळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर बोलण्यास मात्र मोहिते पाटील यांनी टाळले आहे.
मी फक्त माढा लोकसभा मतदारसंघातील गावो गावी फिरून लोकांच्या भावना जाणून घेत आहे. सगळा दौरा संपल्यावर दादांना रिपोर्ट देणार आहे. निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचे मोहिते पाटील म्हणाले.
हाती तुतारी घ्या, मोहिते पाटलांना कार्यकर्त्यांचा सल्ला
मोहिते पाटील यांनी हातात तुतारी घ्यावी कारण, सध्या राज्यात भाजप विरोधी वातावरण आहे अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. भाजप मोहिते पाटील याना संपवू पाहत आहे.
धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यात राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड यांच्या घरी गेले होते. यावेळी येथील ग्रामस्थांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणूक लढण्याचा सल्ला दिला. जर आता तुम्ही शांत झाला
तर तुम्हाला तालुका पातळीचा नेता बनवतील आणि शेवटी तुमच्या तालुक्यात आमदारकी देखील भाजप ठरवेल असे कार्यकर्ते म्हणाले. आता भाजप सोडा आणि शरद पवार यांची तुतारी हाती घ्या असे कार्यकर्ते सांगत आहेत.
0 Comments