सांगोला येथे भव्य खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : शोतोकॉन स्पोर्ट्स कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन व शावोलियन वर्ल्ड मार्शल आर्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 24 मार्च 2024 रोजी
अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल) सांगोला येथे एक दिवसीय खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कराटे स्पर्धा कता व कुमिते प्रकारानुसार घेण्यात येणार आहेत सांगोला तालुक्यातील सर्व कराटे स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत या स्पर्धेला पंच म्हणून मान्यताप्राप्त संघटनेचे अ श्रेणी पंचांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होणार आहे
विजेत्या स्पर्धकांना प्रथम द्वितीय तृतीय मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे विजेत्या संघात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात येणार आहे.
यशस्वी स्पर्धकांचे गोवा येथे ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्याकरता निजेंद्र चौधरी श्रावणी वाघमारे आशिष कोकरे राधिका गारळे धनश्री येडगे सुशांत येडगे मयंक स्वामी आवेश फारुकी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यकारी ग्रुप नेमण्यात आलेले आहेत
अशी माहिती स्पर्धा संयोजक श्री सुनील वाघमारे सर यांनी सांगितलेली आहे. सांगोल्यातील स्पर्धकांना स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी 7378479090
9970606909 या नंबर वर संपर्क साधावा.
0 Comments