google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...पोनि भिमराव खणदाळे यांच्या आदेशान्वये गणेश कुलकर्णी यांची वाळू माफिया वर दबंग कारवाई

Breaking News

मोठी बातमी...पोनि भिमराव खणदाळे यांच्या आदेशान्वये गणेश कुलकर्णी यांची वाळू माफिया वर दबंग कारवाई

मोठी बातमी...पोनि भिमराव खणदाळे  यांच्या आदेशान्वये गणेश कुलकर्णी यांची वाळू माफिया वर दबंग कारवाई


सांगोला/( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)




सांगोला पोलीस स्टेशनचे पोकों गणेश अनिल कुलकर्णी  पोनि भिमराव खणदाळे सो यांचे आदेशान्वये  सपोनि जगताप सो।, पोकों/178 पांढरे  

अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी पोलीस ठाणे हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना जुना मेडशिंगी रोड खारवटवाडी येथे आलो असता या वाळू माफिया वरती

 सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी यांच्याकडून दबंग स्टाईलने कारवाई करून जवळपास साडेचार लाखाचा मुद्द्यमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, खारवटवाडी येथील माण नदी पात्रातुन 

सांगोला शहराकडे एक टेम्पो हा अवैध वाळु भरुन जात आहे. अशी माहीती मिळाली, त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक सो यांना संपर्क करुन बातमीबाबत माहिती दिली.

 त्यांनी तात्काळ कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने सदर बातमीचे ठिकाणी खारवटवाडी येथील माण नदी

 पात्राकडे जाणारे कच्चा रस्त्याने असता नदी पात्रातुन सांगोला शहराकडे एक क्रीम कलरचा एक 407 टेम्पो येत असल्याचे दिसले. 

सदर टेम्पो चालकास  हाताचे इशाराने टेम्पो थांबविणेबाबत इशारा केल्यावर त्याने त्याचे ताब्यातील टेम्पो रस्त्याचे कडेला थांबविला. ती वेळ 21/00 वा ची होती. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता 

त्याने त्याचे नाव प्रशांत प्रकाश खाडे वय-35रा. खारवटवाडी ता. सांगोला असे असल्याचे सागितले. पकडलेल्या टेम्पोची पाहणी केली असता त्याचे पाठीमागील हौद्यामध्ये वाळु भरली

 असल्याचे दिसुन आले. सदर वाळुचे वाहतुकीचे परवानगी बाबत चालकाकडे विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. 

पकडलेल्या टेम्पोचे वर्णन खालील प्रमाणे- 4,00,000/-रु कि.चा एक क्रीम रंगाचा टाटा कंपणीचा 407 टेम्पो त्याचा आरटीओ नं- एम. एच. 13 AN 0160 असा असलेला आ.जु.वा.किं.अं., 5,000/- रु किंमतीची

 अंदाजे एक ब्रास वाळु किं.अं.4, 05,000/- रुपये येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा वाळुने भरलेला एक क्रीम रंगाचा टाटा कंपणीचा 407 टेम्पो मिळुन आल्याने

 त्याव्रील चालक नामे प्रशांत प्रकाश खाडे वय-35रा. खारवटवाडी ता. सांगोला याचेसह पोलीस ठाणेस  दि.19 मार्च रोजी 21/00 वा चे. सुमारास एक क्रीम रंगाचा टाटा कंपणीचा 407 टेम्पो त्याचा आणलेला आहे.

आरटीओ नं- एम. एच. 13 AN 0160 यावरील चालक नामे प्रशांत प्रकाश खाडे वय-35रा. खारवटवाडी ता. सांगोला याने त्याचे ताब्यातील वरील टेम्पोचे 

पाठीमागील हौद्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळु बेकायदेशीर रित्या शासनाची रॉयलटी न भरता स्वतःचे फायद्याकरिता चोरुन वाहतुक करीत असताना मिळुन आला आहे.  

त्यांचे विरुध्द सांगोला पोलीस स्टेशन कडील पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी यांनी भादवि कलम 379, सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9,15 प्रमाणे कायदेशीर कार्यवाही केली केली आहे. 

त्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये वाळू माफी यांच्या मध्ये एक मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस निरीक्षक पोनि भिमराव खणदाळे व पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी यांच्यामुळे पुन्हा एकदा सांगोला तालुक्यात पोलिसांची ताकद वाळू माफी यांना दाखवून दिल्याची चर्चा जनतेमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments