google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ..सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आश्रम शाळेतील मुलांना आणण्यासाठी गेलेल्या ऊसतोडी करणाऱ्या आदिवासी महिलेवर पोलिसाकडून बलात्कार

Breaking News

खळबळजनक ..सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आश्रम शाळेतील मुलांना आणण्यासाठी गेलेल्या ऊसतोडी करणाऱ्या आदिवासी महिलेवर पोलिसाकडून बलात्कार

खळबळजनक ..सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आश्रम शाळेतील मुलांना आणण्यासाठी गेलेल्या ऊसतोडी


करणाऱ्या आदिवासी महिलेवर पोलिसाकडून बलात्कार

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आश्रम शाळेतील मुलांना आणण्यासाठी गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका आदिवासी महिलेवर भुम येथील पोलीसानेच एका होमगार्ड कर्मचाऱ्याच्या मदतीने पाशवी अत्याचार केला.

पोलिसानेच होमगार्डच्या मदतीने बलात्कार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी दगडु सुदाम भुरके, (पोलीस ठाणे, भुम) व सागर चंद्रकांत माने. (रा. भुम जिल्हा धाराशिव) या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा या गावात रहिवासी असलेले आदिवासी समुदायाचे कुटुंब हे जामखेड तालुक्यातील नायगाव येथे ऊसतोडी काम करत आहे.

 पीडित महिला व तिचा दीर या दोघांची मुले ही बार्शी तालुक्यातील येवली येथील आश्रम शाळेत शिकत आहेत. मात्र त्यांना समजले की त्यांची मुले आश्रमशाळेतून पळून गेली आहेत.

त्यामुळे पीडित महिला व तिचा दीर हे दोघेजण 3 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता खर्डा येथून भूम कडे निघाले.

 त्यावेळी दुपारी तीनच्या सुमारास भूम बस स्टॅन्ड येथे ते पोचले व बसची वाट पाहत होते. यानंतर त्या ठिकाणी एक इसम आला व तुम्ही येथे का थांबला आहेत, 

तुम्ही चोर दिसता, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातो मी पोलीस आहे असे म्हणुन त्याने मोबाईलवर दुसर्‍या व्यक्तीला फोन लावला बस स्टँड मध्ये गाडी घेऊन ये असे सांगितले. 

यानंतर पांढर्‍या रंगाची चारचाकी गाडी त्या ठिकाणी आली तसेच पिडीत महीलेला दहा हजार रुपयांची मागणी केली. नाहीतर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू असा दम दिला. त्या पीडित महिलेने वारंवार विनंती करून देखील ते ऐकत नव्हते

 त्यावेळी त्या पिढीत महिलेने जामखेड तालुक्यातील नायगाव येथील ऊसतोड कामगारांचे मुकादम नंदू उगले यांना फोन लावून पैसै पाठवण्यास सांगितले. त्यांनी होमगार्ड सागर माने यांच्या फोन पे ला दहा हजार हजार रुपये पाठवले.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर भूम पोलीस स्टेशनचा आरोपी पोलीस दगडू भुरके हा म्हणाला की मी तुम्हाला बार्शी येथे जाणार्‍या गाडीत बसवून देतो आसे म्हणून तीच्या सोबत असलेल्या दिराला व पिडीत महिलेला परांडा रोडकडे घेऊन गेले.

 आरोपी पोलीस हा तिच्या दिराला म्हणाला की तु इथेच थांब पोलीस स्टेशन मधून मला फोन आला आहे. तु मॅडमला भेटायला चल असे म्हणून तू माझ्यासोबत शारीरिक संबंध कर तुला मॅडम कडुन सोडवतो तसेच तुझ्या दिराला केस मध्ये अडवणार नाही. 

त्यावेळी त्या पीडित महिलेने खुप विनंती केली मी तसे काही करणार नाही तरीसुद्धा त्या पोलिस कर्मचार्‍याने हाताला धरून तिला बळजबरी करून ज्वारीच्या शेतात घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. 

यानंतर पीडीत महिलेने घडलेला प्रकार ऊसतोड मुकादम व तिच्या वडीलांना सांगितला. पिडीत महीलेने दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments