google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 टेंभू म्हैशाळ सहित माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे नियोजन करावे. सांगोला येथे जलसंपदा अधिकाऱ्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सूचना.

Breaking News

टेंभू म्हैशाळ सहित माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे नियोजन करावे. सांगोला येथे जलसंपदा अधिकाऱ्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सूचना.

 टेंभू म्हैशाळ सहित माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे नियोजन करावे.


सांगोला येथे जलसंपदा अधिकाऱ्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सूचना.

सांगोला (वार्ताहर) : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :-  सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने व मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने आगामी उन्हाळ्यात तीव्र

 पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी उन्हाळी आवर्तनाचे पाणी देणे गरजेचे आहे

 त्यामुळे टेंभू म्हैशाळ योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या

 कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. या बैठकीसाठी सांगली विभागाचे अधिकारी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे,

 म्हैशाळ योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्यासह सर्व उपअभियंता व सहाय्यक अभियंता उपस्थित होते. 

 येत्या सोमवारी टेंभू योजनेचे पाणी लाभक्षेत्रातील गावांना सुरू करावे कोळा, जुनोनी, जुजारपूर, हटकर मंगेवाडी,

 हातीद, पाचेगाव, राजुरी, वाटंबरे यासह पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावा मार्गे माण नदीमध्ये पाणी सोडून

 या नदीवरील सर्व १७ बंधारे चांगल्या क्षमतेने भरण्याचे नियोजन करावे तसेच म्हैशाळ योजनेतून लाभक्षेत्रातील सर्व गावांना पाणीपुरवठा करून कोरडा नदीमध्येही पाणी

 सोडून बंधारे भरण्याचे नियोजन व्यवस्थित करण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

 कोणत्याही गावाला पाणी कमी पडू नये याची दक्षता घेण्याच्या ही सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

   यावर अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी उन्हाळी आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याचे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांना दिले.

Post a Comment

0 Comments