google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महविद्यालयाचा जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महविद्यालयाचा जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

 डॉ. गणपतराव देशमुख महविद्यालयाचा जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) - शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता डॉ. गणपतराव देशमुख महविद्यालयाचा जिमखाना डे व

 पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  प्रख्यात लेखक मा.श्री. विश्वास पाटिल यांनी आपल्या मनोगतात

 निष्ठा म्हणजे काय हे गणपतराव देशमुख  यांच्याकडून शिकावे असे सांगितले . तसेच पुढे त्यांनी असे सांगितले कि जीवनात मोठे यश मिळवण्यासाठी आपल्या जवळचे आदर्श आपण शोधले पाहिजेत.

 विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी पाहिली पाहिजेत. लोकांना कसे पारखावे हे शिवाजी महाराज यांच्याकडून शिकले पाहिजे असे ही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे माजी अध्यक्ष आबासाहेब उर्फ कै. डॉ. गणपतरावजी  देशमुख साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 प्रतिमा पूजनानंतर  प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.डॉ. किसन माने यांनी आपल्या ओघवत्या शैलीत करून दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला.

 स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी केले त्यामध्ये त्यांनी आपले सहकारी प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थी व महाविद्यालय यांचे कौतुक केले. 

प्रास्ताविकपर भाषणानंतर वार्षिक अहवाल वाचन सांस्कृतिक कमिटीचे चेअरमन प्रा. डॉ. मनोजकुमार माने यांनी केले. त्यानंतर गुणवंत प्राध्यापक डॉ. किसन माने, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा.डॉ. आर.एस गायकवाड,

 प्रा.डॉ. आदलिंगे एन.पी., प्रा. डॉ. घाडगे के.बी, प्रा.डॉ.सौ. सीमा गायकवाड, प्रा. अशोक वाकडे यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतातनंतर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. विजय पवार यांनी क्रीडा विभागातील पुस्कार व बक्षिस वितरण विद्यार्थ्यांना वितरित केले. 

बक्षिस वितरण प्रमुख मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आले. क्रिडा स्पर्धेच्या बक्षिस वितरणानंतर बौद्धिक स्पर्धांचे बक्षिस वितरण प्रा. डॉ. पांडुरंग रुपनर यांनी संबंधित विद्यार्थ्यांना केले. 

त्यामध्ये निबंध स्पर्ध, पोस्टर मेकिंग, रांगोळी, पाककला, फोटो इत्यादी अनेक प्रकारच्या बौद्धिक स्पर्धांचे बक्षिस वितरण प्रमुख मान्यवरांचा हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले.

बक्षिस वितरानंतर प्रसिद्ध कवी, लेखक, प्रकाशक प्रा. इंद्रजीत घुले यांनी चारोळ्या व कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदशन केले. 

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थचे सचिव मा. श्री विठ्ठलराव शिंदे यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले कि सामान्यातून असामान्य व्यक्तीमत्व घडले पाहिजे.

 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नॅक समितीचे समन्वक प्रा. डॉ. शंकरराव धसाडे यांनी केले. सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक मा.श्री. अवधूत कुमठेकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे,

 सांगोला नागरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष सौ. स्वातीताई मगर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे माजी प्राचार्य बनकर एम.डी व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Post a Comment

0 Comments