कामाची बातमी! नववी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे पुस्तके उघडून परीक्षा देण्याची मुभा; 'या' महिन्यापासून ओपन बुक एक्झाम शक्य
सीबीएसईचे (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) इयत्ता ९वी ते १२वीचे विद्यार्थी आता पुस्तके आणि नोट्स उघडून परीक्षा देऊ शकतील.
नॅशनल क्युरीकुलम फ्रेमवर्कच्या (एनएफसी) शिफारसीअंतर्गत ही ओपन बुक एग्झाम (ओबीई) पायलट प्रोजेक्ट म्हणून याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
एनएफसीचे म्हणणे आहे की, यामुळे विद्याथ्यांत परीक्षेबद्दलचा अनावश्यक तणाव, चिंता कमी होईल. दिल्ली विद्यापीठाने २०२० मध्ये अशी परीक्षा घेतली होती. मात्र, नंतर ती बंद करण्यात आली.
सुरुवातीला काही शाळांतच
सूत्रांनुसार, सुरुवातीला काही शाळांतच हा प्रयोग केला जाईल. नंतर तो देशभरात लागू केला जाईल.
• ९वी-१०वी : गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयामध्ये. – ११वी-१२वी : इंग्रजी, गणित, जैव विज्ञान विषयात.
अनेक देशांमध्ये हा प्रयोग
युरोप: नॉर्वे, फिनलंड, स्वीडन आणि डेन्मार्कच्या शाळांमध्ये.
• अमेरिका : विधी महाविद्यालय व अॅडव्हान्स्ड प्लेसमेंट एग्झाम.
• जर्मनी : इंजिनियरिंगचा कोर्स. ऑस्ट्रेलिया : वैद्यकीय परीक्षेत.
ब्रिटन: अर्थशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात.
0 Comments