संजय राऊत म्हणजे पाच लिटर रॉकेल, दोन काड्याच्या पेट्या घेऊन नारळाच्या
झाडाखाली बसलेला माणूस शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचा संजय राऊतांना सणसणीत टोला
शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भात वृत्त दिले असून त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत हे पाच लिटर रॉकेल आणि दोन काड्याच्या पेट्या घेऊन सकाळी नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस आहेत, अशी खोचक टीका
शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांवर केली आहे. यापूर्वीही अनेकदा शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुक झाली.
संजय राऊत यांना चांद्रयानात बसवून नेलं असतं तर महाराष्ट्रातील किरकिर गेली असती,” अशी खोचक टीका शहाजीबापू पाटील यांनी केली यापूर्वी संजय राऊत यांच्यावर केली होती. तेव्हा ते त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते.
शहाजीबापू पाटील यांनी माढा लोकसभेसंदर्बात देखील वक्तव्य केलं. ती जागा भाजपाची असून शिवसेना त्या जागेची मागणी करणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देणार असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, गणपतराव देशमुख यांचे नातू माढा लोकसभा लढणार अशीही चर्चा आहे..
यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, कॉलेजची पोरं कशाला खासदारकी लढवतील. त्यांना आमदारकी लढू द्या. सध्या लोकसभेची तयारी सुरु झाल्याचेही आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले.
0 Comments