महूद गावातील जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला अखेर यश मागणी मान्य...
राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांनी घेतली दखल दिले पत्र.....
महूद ता.सांगोला येथे अनेक दिवस झाले पत्रकार पवन बाजारे व महूद ग्रामस्थ यांच्याकडून महूद गावातून जाणारी सर्व जडवाहतूक बंद करण्यासाठीच्या मागणीला अखेर यश आले आहे दिनांक 20 फेब्रुवारी पासून ते 23 फेब्रुवारी
पर्यंत चार दिवस पवन बाजारे यांचे बेमुदत आमरण उपोषण चालू राहिले व महूद ग्रामस्थांच्यावतीने उपोषणाला पाठिंबा म्हणून उपोषणाच्या चौथ्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत
कडकडीत गाव बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला. त्यामुळे अखेर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडून तातडीने कार्यकारी अभियंता
राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांना तातडीची नोटीस काढण्यात आली व उपोषणाच्या चौथ्या दिवशी कार्यकारी अभियंता शेळके साहेब राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन
त्या विभागाचे एज्युकेटी इंजिनियर राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर परमेश्वर सुतार साहेब यांना पत्र घेऊन पाठवले यावेळी सोबत सांगोला मंडलअधिकारी, महूदचे तलाठी व पोलीस पाटील यांनी उपोषण
स्थळी येऊन अधिकृत पत्र पवन बाजारे यांना महूद ग्रामस्थांच्या साक्षीने दिले व आठ दिवसांमध्ये आम्ही संबंधित विभागाची कॉमन मीटिंग लावून यावरती
तातडीने निर्णय घेऊ नॅशनल विभागाचे सुतार साहेब यांनी सांगितले. यावेळी महूद ग्रामस्थांच्या वतीने डॉ. शरद नागणे यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना जडवाहतूक
बंद करण्यासंदर्भात वस्तुस्थिती गांभीर्याने घेऊन यावरती तातडीने निर्णय तुम्ही घ्यावा व महूद गावातून जाणारी संपूर्ण जड वाहतूक बंद करावी अन्यथा अजून उग्र स्वरूपाचे आंदोलन
आम्ही महूद ग्रामस्थ करू याची दखल तुम्ही घ्यावी असे ठणकावून सांगितले नंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या हातून उपोषण कर्ते पत्रकार पवन बाजारे यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.
0 Comments