२५ फेब्रुवारी ला सांगोल्यात जमणार सुप्रसिद्ध सेलिब्रिटी व विचारवंत
सीबीएस न्युज चा दिमाखदार पाचवा वर्धापन दिन सोहळा
नाझरे :- बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरतानाय संतुलित जगण्याचा मंत्र देत सामान्य माणसाच्या हकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणान्या 'सीबीएस न्युज मराठी' नेआपल्या यशाची पाच वर्ष पूर्ण करून आता सहाव्या वर्षात पदार्पण करित आहेत.
याच पार्श्वभूमीवर पाचवा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वाजता रामकृष्ण गार्डन व्हिला सांगोला येथे साजरा होत आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र भर गाजत असलेले सुप्रसिद्ध कवी व व्याख्याते अनंत राऊत उपस्थित राहनार आहे सोहळ्याचे अध्यक्ष. विभाग प्रमुख पत्रकारिता मा.डॉ. रविंद्र चिपोलकर हे उपस्थित राहणार आहेत
तसेच आमदार शहाजीबापू पाटील, मा. आम.दिपकआबा सांळूखे पाटील व आम. विक्रम दादा सावंत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, हे उपस्थित राहणार आहेत.
सीबीएस न्युज मराठी ने महाराष्ट्राच्या या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सकारात्मक निरपेक्ष बातम्या देऊन वाचकांचा विश्वास संपादन केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत गेल्या पाचवर्षापासून सीबीएस न्युज मराठी विविध माध्यमातून समाज हिताचे कामे करीत आहे यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
असो, कोरोना योध्दांचा सन्मान असो किंवा आजी माजी सैनिकांना सन्मान सोहळा असो कोणत्याही समाज हिताचे कार्यक्रम सीबीएस न्युज मराठी दरवर्षी राकडून महाराष्ट्रात वेगळा आदर्श निर्माण करीत आहे.
याच पार्श्वभूमीवर यंदा सीबीएस न्युज मराठी ५ या वर्धापन दिनाच्या निमिताने विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे
त्यामध्ये महाकव्य मैफल, वर्धापन दिन महोत्सव सह राज्यस्तरीय पुरस्कार पितरण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे माहिती नियोजन समितीच्या पतीने प्रसारमाध्यमांना दिली आहे.
महाराष्ट्राच्या माणसाच्या मनातला ओलावा आणि 'सीबीएस न्युज मराठी' म धील महाराष्ट्रा विषयीची आस्था, स्नेह वृद्धिंगत होत राहिले.
ही सुखद आणि आधासक वाटचाल केवळ आपल्यासारख्या सुइदांच्या स्नेह व पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे. ह्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन सीबीएस न्युज परिवाराने केले आहे.
0 Comments