google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपालिका आरोग्य प्रशासन म्हणजे दिव्याखाली अंधार ? नगरपालिकेच्या शेजारील ओढा स्वच्छ व शहरातील मुतारी दुरुस्ती करण्याची मागणी

Breaking News

सांगोला नगरपालिका आरोग्य प्रशासन म्हणजे दिव्याखाली अंधार ? नगरपालिकेच्या शेजारील ओढा स्वच्छ व शहरातील मुतारी दुरुस्ती करण्याची मागणी

 सांगोला नगरपालिका आरोग्य प्रशासन म्हणजे दिव्याखाली अंधार ? नगरपालिकेच्या शेजारील ओढा स्वच्छ  व शहरातील मुतारी दुरुस्ती करण्याची मागणी


(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरातून मध्यवर्ती भागात असणारा ओढा या ओढ्यामध्ये शहरातील हद्दवाढ भागातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहून येत

 असते ते सांडपाणी वाहत राहिल्यास त्या पाण्यात डासांची उत्पत्ती अथवा आरोग्याला बाधक असे काही होत नाही

 तसेच शहरातील ते ठिकाणी असणाऱ्या मुताऱ्या पडल्याने नागरिकांना त्याच्या दुर्गंधाचा घाणीचा वास येत असून लोक उघड्यावर लघवी करताना दिसत आहेत काही ठिकाणच्या मुताऱ्या पडल्या आहेत

 त्यांची दुरुस्ती करण्यात यावी परंतु सांगोला नगरपालिकेच्या लगतच असणाऱ्या या ओढ्यामध्ये स्वच्छता केली जात नसल्याने विविध ठिकाणी सांडपाणीसाचले आहे त्यामुळे रोगराई पसरण्याला मदतच होते

 असा घाणीच्या साम्राज्याचे विदारक असे चित्र नगरपालिकेच्या शेजारीच असल्याने सांगोला नगरपालिका आरोग्य विभाग याचे कामकाज म्हणजे दिव्याखाली अंधारच आहे का ? असा सवाल या माध्यमातून विचारला जाऊ लागला आहे.

सांगोला शहरात मध्यवर्ती असणारे या ओड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला असल्यानेयामध्ये डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे तसेच या ओढ्यालगत ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा देखील त्रास सहन करावा लागत आहे

 त्यामुळे सांगोला नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी आरोग्य विभागाला या ओढ्याची स्वच्छता करण्यासाठीच्या सूचना कराव्यात अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments