सांगोला यात्रेतील पाळण्याच्या हिशेबावरून दोन गटात जीवघेणा काठ्या, लोखंडी रॉड व चाकूने मारहाण..दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल
सांगोला यात्रेत पाळण्याच्या हिशेबावरून बाचाबाची होऊन काठ्या, लोखंडी रॉड व चाकूने मारहाण केल्याप्रकरणी दोघांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना शनिवारी सांगोला येथील यात्रेत घडली.
भैरवनाथ सोपान इंगोले (वय ३८, रा. वाढेगाव, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते यात्रेत पाळणा चालवण्याचा व्यवसाय करतात. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मार्केट यार्ड, सांगोला येथे जनावरांच्या बाजारात पाळणा लावण्याच्या
ठिकाणी यात्रेमध्ये पाळणा चालविण्याचा हिशेब करणेकरिता इंगोले हे व भाऊ नवनाथ सोपान इंगोले, सचिन सोपान इंगोले व मुलगा प्रणव भैरवनाथ इंगोले, पुतण्या यतीन नवनाथ इंगोले असे गेले होते.
त्यावेळी विलास भिवा चव्हाण व फिर्यादी इंगोले यांच्यात पाळण्याच्या व्यवहाराची बोलणी सुरू होती. विलास चव्हाण हा फिर्यादीस तुझे कसले पैसे, तुला कालच पैसे दिले आहेत,
आता आमच्याकडेतुझा काही हिशेब शिल्लक नाही असे म्हणत होता. त्यावेळी फिर्यदीने त्यांना पाळणा आणण्याचा, लावण्याचा, जागा भाड्याचा खर्च देखील आमचा निघाला नाही असे म्हणत
असताना अचानक कैलास भिवा चव्हाण, रोहित सुरेश चव्हाण, वैभव विलास चव्हाण, सुरेश भिवा चव्हाण, सचिन दादा चव्हाण, रोहन सुरेश चव्हाण, दादा भिवा चव्हाण असे लोक पळत आले.
त्यातील कैलास भिवा चव्हाण व वैभव विलास चव्हाण यांच्या हातात लोखंडी पाईप तर रोहित सुरेश चव्हाण याच्या हातात चाकू होता तसेच इतर सर्वांच्या हातात लाकडी काठ्या होत्या.
त्या सर्वांनी येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात करून कैलास भिवा चव्हाण व वैभव विलास चव्हाण यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीचा भाऊ सचिन सोपान इंगोले याच्या डोकीत जोराने मारहाण केली.
रोहित सुरेश चव्हाण याने त्याच्याकडील चाकू फिर्यादीला मारला. सुरेश चव्हाण, विलास चव्हाण, सचिन चव्हाण, रोहन चव्हाण, दादा चव्हाण यांनी त्यांच्याकडील काठ्यांनी मारहाणकेली आहे.
त्यांच्या मारहाणीत फिर्यादी, त्याचा भाऊ सचिन इंगोले, नवनाथ इंगोले असे जखमी झाल्याची घटना घडली आहे. यातील जखमी सचिन सोपान इंगोले याच्या डोकीत लोखंडी पाईपचा मार लागून
जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी मिरज येथे पाठवले आहे. याबाबत भैरवनाथ इंगोले याने कैलास भिवा चव्हाण, रोहित सुरेश चव्हाण, वैभव विलास चव्हाण,
सुरेश भिवा चव्हाण, सचिन दादा चव्हाण, रोहन सुरेश चव्हाण, दादा भिवा चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वैभव विलास चव्हाण (रा. मोहोळ) यांनी यात्रेतील पाळण्याचा हिशेब करीत असताना
आम्हाला भैरवनाथ सोपान इंगवले, सचिन सोपान इंगवले, नवनाव सोपान इंगवले, प्रणव भैरवनाच इंगवले (सर्व रा. वाढेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी आम्हाला तुम्ही पोलीस ठाणेस तक्रार देण्यासाठी का गेला
असे म्हणून शिवीगाळी व दमदाटी करून लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले असले बाबत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments