google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ...जंगलात नेऊन पत्नीसोबत भयंकर कृत्य, पतीने नंतर स्वत:लाही संपवलं

Breaking News

खळबळजनक ...जंगलात नेऊन पत्नीसोबत भयंकर कृत्य, पतीने नंतर स्वत:लाही संपवलं

खळबळजनक ...जंगलात नेऊन पत्नीसोबत भयंकर कृत्य, पतीने नंतर स्वत:लाही संपवलं


पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. त्यानतंर झाडाला गळफास घेत जीवन संपवलं.

पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक बे परिसरात ही घटना घडलीय. सुवर्णा सोमनाथ वाघ असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर सोमनाथ सखाराम वाघ असं पतीचं नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोघे पती- पत्नी रविवारी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात आले. 

त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली. ते दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. तिथे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला.

पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला. दरम्यान, सकाळी ११ वाजून गेले तरी ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध घेतला. 

सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात दिसली. परिसरात शोध घेतला असता आईचा मृतदेह आढळला. तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

पिंपरीत ८ वर्षीय मुलाचे अपहरण, खून करून कचऱ्यात फेकलं

पिंपरी चिंचवड शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला आहे. 

आठ वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यासाठी मुलाचं अपहरण करण्यात आलं आणि यानंतर त्याचा खून करण्यात आला आहे. सलमान राधेश्याम बर्डे असं अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.

 शनिवारी रात्री सलमान बर्डेचा अपहरण करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणात वाकड पोलिसांनी पवन जोगेश्वरप्रसाद पांडे या संशयित आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments