google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...‘किस पाहिजे का’ ? शिक्षकाकडून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

Breaking News

खळबळजनक घटना...‘किस पाहिजे का’ ? शिक्षकाकडून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

 खळबळजनक घटना...‘किस पाहिजे का’ ? शिक्षकाकडून


महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकानेच महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन 

मुलीला कॉलेजच्या स्टाफ रुममध्ये बोलावून घेत ‘किस पाहिजे का’ असे म्हणत विनयभंग केला.याप्रकरणी वानवडी पोलिसांनी शिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

 याबाबत पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रमेश किसन चव्हाण (वय-32 रा. भेकराई नगर, हडपसर) याच्यावर आयपीसी 354(ड) सह पोक्सो

 अॅक्ट कलम 9(फ), 10, 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वानवडी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते.

 त्याच महाविद्यालयात आरोपी रमेश चव्हाण हा शिक्षक आहे. आरोपीने पीडित तरुणीच्या मोबाईलवर वारंवार आय लाईक यु, आय लव यू असे मेसेज पाठवून त्रास दिला.

 तिला व्हिडिओ कॉल करुन तिच्यासोबत अश्लील बोलून मानसिक त्रास दिला. तसेच आरोपीने पीडित तरुणीला कॉलेजमधील शिक्षकांच्या स्टाफ रुममध्ये बोलावून घेतले. 

पीडित तरुणी स्टाफ रुममध्ये आली असता ‘किस पाहिजे का’ अशी विचारणा करुन तरुणीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड करीत आहेत.

Post a Comment

0 Comments