google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला-जत रोडवरील लोणविरे फाट्याजवळ मालट्रकने धडक दिल्याने दूध उत्पादक शेतकरी जागीच ठार

Breaking News

सांगोला-जत रोडवरील लोणविरे फाट्याजवळ मालट्रकने धडक दिल्याने दूध उत्पादक शेतकरी जागीच ठार

 सांगोला-जत रोडवरील लोणविरे फाट्याजवळ मालट्रकने धडक दिल्याने दूध उत्पादक शेतकरी जागीच ठार


सांगोला : भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने डेअरीला दूध घालून घराकडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात जखमी झालेला दूध उत्पादक शेतकरी जागीच ठार झाला.

 हा अपघात बुधवारी रात्री ७:४५ च्या सुमारास सांगोला-जत रोडवरील लोणविरे फाट्याजवळ घडला.चंद्रकांत बजरंग गायकवाड (५०, रा. लोणविरे, ता. सांगोला) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 

याबाबत सुनील महादेव पाटील यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी चालक रावसाहेब मुरलीधर (कुटे, रा. जिवाचीवाडी, ता. केज, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

लोणविरे येथील मयत चंद्रकांत गायकवाड हे ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास दूध घालण्यासाठी एमएच ४५ /एम ७७३० या दुचाकीवरून दूध डेअरीवर आले होते.

 दूध घालून पुन्हा त्याच दुचाकीवरून सोनंद-सांगोला रस्त्याने घराकडे निघाले असता रात्री ७:४५ च्या सुमारास सोनंदकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच १२ /युएम ७५२२ या मालट्रकने पाठीमागून त्यांच्या दुचाकीस लोणविरे फाट्याजवळ धडक दिली.

अपघातात चंद्रकांत गायकवाड यांच्या डोक्यास, पायास गंभीर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने जागीच ठार झाले. अजित गायकवाड यांनी अपघाताबाबत माहिती दिल्याचे सुनील पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments