सांगोला तालुक्यातील घटना...जत्रा पाहण्यास आलेल्या जोडप्यास तीन चोरट्यांनी चाकूने वार
करून धाक दाखवून रोख व सोने असे ७९ हजार रुपयाचा ऐवज लुटला
सांगोला : सासरवाडीत जत्रा पाहून नवरा बायको सोळा चाकी ट्रेलर मध्ये झोपण्यासाठी आल्यास काळे कपडे परिधान केलेले
अज्ञात तीन चोरट्यांनी चाकूने वार करून धाक दाखवून रोख व सोने असे ७९ हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला.
ही घटना सांगोला तालुक्यातील तिप्पेहाळी गावातील जुना माऊली ढाबा येथे ३१ जानेवारी रोजी रात्री एक वाजता घडली.
संजय गवंड (वय ४७) यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. गवंड हे आटपाडी येथील रहिवासी असून ते ट्रेलरचे चालक आहे.
माल भरून पुण्याला चालले होते परंतु तिप्पेहाळी येथे सासरवाडीत जत्रेला नवरा बायको दोघेही ट्रेलरसह गेले.
माऊली धाब्याजवळ ट्रेलर लावून यात्रा पाहिली. रात्री एक वाजता ट्रेलरमध्ये येऊन झोपले, तेवढ्यात काळे कपडे परिधान केलेले
अज्ञात पंचवीस ते तीस वयाच्या तीन चोरट्यांनी दरवाजाच्या काचा फोडून प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून
व वार करून रोख पाच हजार रुपये ६४ हजाराचे दागिने व प्रत्येकी पाच हजाराचे दोन मोबाईल जबरदस्तीने चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments