google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...सांगोला तालुक्यातील घेरडी येथे मालक घरात झोपला अन् बनावट चावीने ट्रक पळवला

Breaking News

खळबळजनक...सांगोला तालुक्यातील घेरडी येथे मालक घरात झोपला अन् बनावट चावीने ट्रक पळवला

 खळबळजनक...सांगोला तालुक्यातील घेरडी येथे मालक घरात झोपला अन् बनावट चावीने ट्रक पळवला


सांगोला: ट्रक मालक घरात झोपल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने १२ टायरचा मालवाहतूक ट्रक चालू करून पळवून नेला. ही घटना घेरडी (ता. सांगोला) येथे रोहन कुमार साळुंखे यांच्या घरानजीक घडली.

याबाबत ट्रकमालक सागर भिवा पवार (रा. शेगाव रोड हनुमाननगर, जत जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सागर पवार यांच्याकडे तीन ट्रक असून ते आणि भाऊ चालवतात. ते जतमधून (के.ए. २२ / सी. २२७२) या १२ टायर

 ट्रकमध्ये विटा भरून घेरडी येथे घेऊन निघाले होते. त्यांचे नातेवाईक रोहनकुमार साळुंखे यांच्याकडे ट्रकमधील विटा उतरविल्या.

 त्यानंतर ट्रक काही अंतरावर रोडवर दरवाजे लॉक करून उभा केला. घरी झोपले असताना चोरट्याने ट्रक पळवला.

Post a Comment

0 Comments