google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कुणबी प्रमाणपत्र ! राज्यातील पहिली घटना सोलापूर जिल्ह्यातील एकाच परिवारात तब्बल ८६ कुणबी प्रामाणपत्रांचे विरारण

Breaking News

कुणबी प्रमाणपत्र ! राज्यातील पहिली घटना सोलापूर जिल्ह्यातील एकाच परिवारात तब्बल ८६ कुणबी प्रामाणपत्रांचे विरारण

 कुणबी प्रमाणपत्र ! राज्यातील पहिली घटना सोलापूर जिल्ह्यातील एकाच  परिवारात तब्बल ८६ कुणबी प्रामाणपत्रांचे विरारण 


 राज्यभरातून मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्रांची मागणी करीत असताना, सोलापूर जिल्ह्यातील एकाच  परिवारात तब्बल ८६ कुणबी प्रामाणपत्रांचे विरारण करण्यात आले असून राज्यातील ही पहिली घटना आहे. 

राज्यात उफाळलेल्या मराठा आरक्षणाची धग कमी होत नसतानाच, अनेक मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. प्रत्यक्षात कुणबी असूनही आरक्षण आणि सवलतीपासून 

मराठा समाजाला वंचित राहावे लागले आहे हे आता समोर येत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता, 

त्यांनी हे आंदोलन यशस्वी केले आहे. शासनाने त्यांची अनेकदा फसवणूक केली आहे परंतु राज्यातील मराठा बांधव त्यांच्या मागे भक्कम उभे आहेत. अजूनही त्यांचे आंदोलन  संपले नसून, 

त्यांच्या प्रयत्नाने राज्यातील लाखो मराठा बांधवांना कुणबी जातीनेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. अजूनही अशा नोंदी आढळत असून, आणखी अगणित मराठा आरक्षणात जाणार आहे. 

आजवर मराठा बांधव आंदोलने करीत राहिला परंतु जरांगे पाटील यांनी शासनाची नस दाबली आणि मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना वेदना झाल्या. 

परंतु काही झाले तरी जे सत्य आहे तेच समोर आले आणि लाखो मराठा कुटुंबात आनंद साजरा झाला. सोलापूर जिल्ह्यात तर राज्यातील पहिली घटना समोर आली आहे. 

एकाच परिवारातील तब्बल  ८६ जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असून अशी घटना राज्यात पहिलीच आहे. माढा तालुक्यातील लऊळ येथील लोकरे कुटुंबात आनंद साजरा करण्यात आला.

 मराठा समाजाचे नेते माउली पवार, राजन जाधव आणि प्रा. गणेश देशमुख यांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन या प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. 

जुन्या कागदपत्रात कुणबी नोंदीचा शोध  घेताना १८५९ मधील कागदपत्रात लोकरे कुटुंबाची कुणबी नोंद आढळून आली होती, 

त्यामुळे या परिवारातील नंदकुमार वामन लोकरे यांनी  प्रमाणपत्र मिळण्यासाठी पिच्छा पुरवला.  

त्यांनी कुटुंबातील सर्वांचीच प्रमाणपत्रे काढून  घेतली.  एकाच परिवारातील तब्बल ८६ जणांना या दाखल्यांचा लाभ झाला आहे त्यामुळे परिवार मोठ्या आनंदात आहे.

 मनोज  जरांगे पाटील यांच्यामुळेच आमच्या परिवाराला हे दाखले मिळू शकले आहेत, शिवाय या आंदोलनात सक्रीय सहभागी असणाऱ्याच्या हातून

 ते प्राप्त झाले आहेत याचा मोठा आनंद असल्याचे विकास लोकरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments