सोमवार दि.12 फेब्रुवारी रोजी मा.प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर पायरी आंदोलन आणि इशारा उपोषण
जिहे -कठापूर योजनेत राजेवाडी तलावाचा समावेश करा आणि माण नदीतील सर्व बंधारे भरून राजेवाडी तलाव भरून द्या या मागणीसाठी आंदोलन
सोमवारी मागणी मान्य न झाल्यास पंतप्रधानाच्या दि.19 फेब्रुवारीच्या कार्यक्रमासमोरच प्रफुल्ल कदम यांच्या जलाभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्याचा जनतेचा इशारा
राजेवाडी तलावाखालील अनेक गावे होणार सहभागी
जिहे-कठापूर उपसा सिंचन प्रकल्पातून राजेवाडी तलावात पाणी भरून मिळण्यासाठी कायमस्वरूपी तरतूद करावी आणि सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजेवाडी तलावात
जिहे-कठापूर प्रकल्पातून तत्काळ पाणी भरून द्यावा या मागणसाठी सोमवारी दि. 12 फेब्रुवारी रोजी किसान आर्मी वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांचे नेतृत्वाखाली
राजेवाडी तलावाखालील शेतकरी दहिवडी तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसून पायरी आंदोलन करणार असून त्याचबरोबर इशारा उपोषणही करणार आहेत.
सोमवारी मागण्या मान्य नाही झाल्यास दि. 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान यांच्या कार्यक्रमासमोरच प्रफुल्ल कदम यांचा शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचा भव्य कार्यक्रम(आंदोलन)होणार आहे.
त्यात सर्व शेतकरी सहभागी होणार असल्याचा इशाराही यावेळी इशारा उपोषणातून देण्यात येणार आहे.
राजेवाडी तलाव हा ब्रिटिश कालीन तलाव असून या तलावाच्या लाभ क्षेत्रात सातारा, सांगली,
सोलापूर जिल्ह्यातील मोठे क्षेत्र येते.या पाण्यावर ऊस, फळबागा व इतर मोठे क्षेत्र अवलंबून आहे. तथापि पाण्याच्या कमतरतेमुळे हे लाभक्षेत्र टंचाई काळात नेहमीच संकटात येते.
त्यामुळे राजेवाडी तलावात बाहेरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. सध्या परिस्थिती पाहता जिहे-कठापूर प्रकल्पातून राजेवाडी तलावात पाणी आणणे तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य आहे.
त्यासाठी जिहे-कठापूर उपसा सिंचन प्रकल्पातून राजेवाडी तलावत पाणी भरून मिळण्यासाठी कायमस्वरूपी तरतूद व्हावी
आणि सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजेवाडी तलावत जिहे-कठापूर प्रकल्पातून तत्काळ पाणी भरून मिळावी ही मागणी प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली आहे.
या आंदोलनामध्ये राजेवाडी तलावाखालील कटफळ, लक्ष्मीनगर, जाधववाडी पवारवाडी,नरळेवाडी, खवासपूर, अचकदानी आदी गावातील शेतकरी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


0 Comments