google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. दत्तात्रय काळेल यांना पी.एच.डी.साठी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाची मान्यता

Breaking News

डॉ. दत्तात्रय काळेल यांना पी.एच.डी.साठी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाची मान्यता

 डॉ. दत्तात्रय काळेल यांना पी.एच.डी.साठी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाची  मान्यता


शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे 9503487812

सांगोला (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मारुती काळेल

 यांना नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाने राज्यशास्त्र विषयांमध्ये विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणून

 नुकतीच मान्यता मिळाली आहे. यामुळे शहरी विद्यार्थ्याबरोबरच विशेषता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी त्यांना संधी मिळणार आहे.

 डॉ.काळेल हे खिलारवाडी गावचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण लोणारवाडी ता. पंढरपूर व माध्यमिक शिक्षण खिलारवाडी माध्यमिक विद्यालय 

खिलारवाडी येथे व महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे तर एम. ए. एम.फील पीएच.डी. चे शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले आहे. 

एम.फील. हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ग्रामीण नेतृत्वाचा एक अभ्यास व पीएच.डी.ही 

शरद पवार आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचे शासन एक चिकित्सक अभ्यास या विषयावरती झाली आहे. 

तसेच अनेक प्रकारचे राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. याबद्दल सर्व स्तरातून डॉ. काळेल यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments