google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारीपदी मोनिका सिंग

Breaking News

मोठी बातमी..सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारीपदी मोनिका सिंग

 मोठी बातमी..सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारीपदी मोनिका सिंग


सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी पदी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील सहआयुक्त मोनिका सिंग यांची सोमवारी (ता. १२) सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारीपदी बदलीने नियुक्ती झाली आहे.

सोलापूरचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूरला झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. महसूल व वन विभागाचे उपसचिव गावडे यांनी सिंग यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. 

मोनिका सिंग या २००२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (उपजिल्हाधिकारी संवर्ग) परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत आल्या आहेत. 

त्यांनी यापूर्वी पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 

सातारा लोकसभा मतदार संघात २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मोनिका सिंग यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यावर असणार आहे

 तर माढ्याची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्यावर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची बदली झाली होती. त्यांच्या जागेवर मनीषा कुंभार यांची नियुक्ती झाली आहे.

 आता ठोंबरे यांच्यानंतर जिल्हा प्रशासनातील अपर जिल्हाधिकारीपदी मोनिका ठाकूर यांच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

Post a Comment

0 Comments