google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना.. नोकरी देतो म्हणून बोलावलं, नशेचं औषध टाकून 20 महिलांवर केला सामूहिक बलात्कार, देशात खळबळ

Breaking News

धक्कादायक घटना.. नोकरी देतो म्हणून बोलावलं, नशेचं औषध टाकून 20 महिलांवर केला सामूहिक बलात्कार, देशात खळबळ

धक्कादायक घटना.. नोकरी देतो म्हणून बोलावलं, नशेचं औषध टाकून 20 महिलांवर केला सामूहिक बलात्कार, देशात खळबळ


राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलांवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 20 महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे.याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, सिरोही नगरचे सभापती, माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी हे कृत्य केले आहे. 

संबंधित महिलांना नोकरी देतो म्हणून महिलांना बोलावून त्यांचे शोषण केले आणि त्यांना धमकावण्यातही आले. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते.

या पीडित महिलांना अंगणवाडीत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापती महेंद्र मेवाडा,

 आयुक्त महेंद्र चौधरीसहित आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय पडसाद उमटयला लागले आहेत.

आपल्याला नोकरी देण्यात येणार होती, असे या महिलांनी सांगितले. त्यांनी आम्हाला बोलावले, गॅंग रेप केला. त्यांनी हे कृत्य करताना महिलांचा व्हिडीओ देखील बनवला आहे. 

पोलिसात तक्रार केलात तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. यामुळे अनेक दिवस हे प्रकरण बाहेर आले नाही.

महिलांना बोलावून त्यांना एका ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले. त्यांची तिथे खाण्याची व्यवस्था करण्यात आली. खाण्यातून नशेचे औषध देण्यात आले 

आणि महिला बेशुद्ध झाल्यावर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला, तसेच नको त्या अवस्थेत त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला.

या प्रकरणी हायकोर्टने आदेश दिल्यानंतर आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. एका पिडित महिलेने हायकोर्टात तक्रार दाखल केली होती. यामुळे हे प्रकरण पुढे आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments