google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !

Breaking News

खळबळजनक घटना...सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !

खळबळजनक घटना...सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !


सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह आठ जणांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात मोठा गुन्हा दाखल झाला असून यामुळे अकलूज परिसर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चोरीच्या उद्देशाने बंगल्यात प्रवेश केल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त यानंतर या तरुणाचा मृत्यू झाला आहे, त्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. 

जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील आणि अन्य आठ जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. 

आता मोहिते पाटील यांना अटक होणार की, ते अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार हे पाहावे लागणार आहे. 

सद्या तरी अकलूज पोलीस मोहिते पाटील यांचा शोध घेत असल्याचे सांगितले जात आहे. चोर समजून मारलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला

 तरी मयत तरुण हा मागासवर्गीय असल्यामुळे या गुन्ह्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अर्थात एट्रोसिटी अंतर्गत कलमांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

 प्रकरणातील मयत तरुण अभिजित केंगार हा १८ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिह मोहिते पाटील यांच्या प्रतापगड या बंगल्यात गेला होता. 

केंगार हा चोरी करण्यासाठीच बंगल्यात आला असल्याचा संशय आल्याने, त्याला पकडून त्याला काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. 

या मारहाणीत तो बेशुद्ध पडला/ त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. केंगार हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याला पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. 

परंतु त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली परंतु तपासात हा गुन्हा निष्पन्न झाला असल्याने पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी सांगितले. 

आता हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्याकडे असून हा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत. या प्रकरणी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह गिरझणी गावचे माजी

 सरपंच सतीश संभाजी पालकर व माजी सदस्य मयूर नवनाथ माने (वय ३३), हिरा रामचंद्र खंडागळे (वय ३०, रा.महर्षी कॉलनी , अकलूज) आणि इतर अनोळखी चार

 साथीदारांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील सतीश पालकर व मयुर माने यांना अटक झाली असता त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 हा गुन्हा दाखल झाला असल्याने माळशिरस तालुका तसेच सोलापूर जिल्हा आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments