मूकबधिर निवासी शाळा सांगोला येथे आरोग्य तपासणी शिबीर
व उदयोजक मार्गदर्शन व्याख्यान आयोजन...
सांगोला प्रतिनिधी:-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जनजागृती प्रबोधन मंच चोपडी संस्था मूकबधिर निवासी शाळा सांगोला येथे आज 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अंतर्गत विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या करिता आरोग्य तपासणी
शिबीर तसेच स्वयंरोजगार, व्यावसाय व्यापार अशा क्षेत्रात भविष्यात करीअर घडविण्यासाठी मान्यवर व्यक्तीचे व्याख्यान पार पडले.
कै.डॉ.भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी सांगोला चे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी,श्री नवनाथ साळुंखे,श्री.राहूल कोडग,श्री. नाना फुले या मान्यवरांचे विदयार्थ्यांनी टाळया वाजवुन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस डॉ. प्रभाकर माळी यांनी मुलांना आरोग्याविषयी चांगले मार्गदर्शन केले.त्यानंतर नाना फुले यांनी मुलांना भविष्यात करिअर घडवण्यासाठी विशीष्ठ कैशल्यावर आधारीत व्यावसाय करण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.शैलजा पाटील प्रा. शिक्षक,श्री. नवनाथ साळुंखे,राहूल कोडग विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.


0 Comments