वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर
सांगोला प्रतिनिधी:( दशरथ बाबर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला) चोपडी गावचे सुपुत्र सध्या पुणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे
सन्माननीय वसंतराव दादासो बाबर यांना पोलीस दलातील सर्वोच्च सन्मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलामध्ये आजपर्यंत केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन
राष्ट्रपती पारितोषिकासाठी त्यांची निवड झाली आहे. भारताचे सन्माननीय राष्ट्रपती यांचे हस्ते त्यांचा राष्ट्रपती पदक देऊन विशेष गौरव करण्यात येत आहे.
वसंतराव बाबर यांनी मुंबई ,सांगली, सातारा, कोल्हापूर येथे काम केले आहे. सध्या ते पुणे, तालुका खेड येथील माळुंगे येथे कार्यरत आहेत.
27 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी 2 वर्षे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या ठिकाणी काम केले आहे
2014 मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांच्या गुणवत्तापूर्ण कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदक बहाल करण्यात येणार आहे.
ग्रामस्थांच्या व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन.त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल मिळालेल्या राष्ट्रपती पदक पुरस्कारामुळे चोपडी गावचे नाव उज्वल झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments