google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे वनविभागाकडून विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका युवकाची तत्परता आणि वन्यप्राण्याला मिळले जीवदान

Breaking News

सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे वनविभागाकडून विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका युवकाची तत्परता आणि वन्यप्राण्याला मिळले जीवदान

 सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे वनविभागाकडून विहिरीत पडलेल्या


कोल्ह्याची सुटका युवकाची तत्परता आणि वन्यप्राण्याला मिळले जीवदान

सांगोला:- उदनवाडी ता. सांगोला येथील बेलवण नदी काठी असणाऱ्या एका सामाईक विहिरीत गेली तीन- चार दिवसांपासून पडलेल्या एका कोल्ह्याची 

सांगोला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचान्यांच्या पथकाने काल गुरुवारी दुपारच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढत सुटका केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय (दत्ता) वलेकर यांची शेत जमीन उदनवाडी मेधील बेलवण नदी काठी असून त्याची सामाईक विहीर आहे. काल वेळ अमावस्या निमित्त शेत मालकाचा भाचा विकासलवटे हा शेतात गेला असता,

त्याला विहिरीत बाजूच्या गवत व कठड्याजवळ कोणतातरी प्राणी हालचाल करत असल्याचे लक्षात आले यावेळी विहिरीत पाहिले तेव्हा विहिरीतील कठड्या नजीक कोल्हा दिसला, यावेळी त्याने संबंधित 

सांगोला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांना फोनवरून माहिती दिली वनपरिक्षेत्र अधिकारी जाधवर यांनी तात्काळ कोळा वनविभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देत, विहिरीतील कोल्ह्याला बाहेर काढण्याच्या सूचना केल्या 

तात्काळ सदर ठिकाणी वनविभागाच्या पथकानेजाऊन कौतुकास्पद कामगिरी करत विहिरीत उतरून जाळीच्या साह्याने कोल्ह्यास बाहेर काढत त्याची सुटका केली. 

सदरची कामगिरी वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एल. वाघमोडे (वनपाल, जुनोनी) एस. एल मुंडे (वनपाल, सांगोला),

 जी. बी. व्हरकटे (बनरक्षक, सांगोला), ए. के. कराडे (वनरक्षक्त, हटकर मंगेवाडी), वनिता इंगोले (वनरक्षक, अधकदानी ). वनमजूर आबा खडके, धाँडीराम पाटील, शंकर शिंदे, पाहन चालक संकेत बाबर आदींनी केली.

Post a Comment

0 Comments