google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील २८० शाळांमधील सोयीसुविधांची पाहणी गुणवत्ता तपासणीसाठी पथकासह जिल्हा न्यायाधीश थेट शाळांवर

Breaking News

सांगोल्यातील २८० शाळांमधील सोयीसुविधांची पाहणी गुणवत्ता तपासणीसाठी पथकासह जिल्हा न्यायाधीश थेट शाळांवर

 सांगोल्यातील २८० शाळांमधील सोयीसुविधांची पाहणी गुणवत्ता तपासणीसाठी पथकासह जिल्हा न्यायाधीश थेट शाळांवर 


सांगोला : सांगोला तालुक्यातील ३८९जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्या. महेश लंबे यांनी स्वतः भेटी देऊन शाळांतील भौतिक सुविधांमध्ये वॉल कंपाउंड, किचन शेड, 

स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची पाहणी केली. गटशिक्षणाधिकारी, पोलिस अधिकारी, पंचायत समिती, तहसील व बांधकाम विभागातील अधिकारी यांचे पथक शाळा स्तरावर भेटी देत आहे.

या पथकाकडून आतापर्यंत तालुक्यातील सुमारे २८० शाळांची तपासणी केली आहे. उर्वरित शाळांच्या तपासणीचे काम सुरू आहे. तपासणीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये सुशोभीकरण व स्वच्छतेची मोहीम राबवली जात आहे.

जिल्हा परिषद शाळांची भौतिक सुविधा व यु-डायस प्रणालीमध्ये भौतिक सुविधांची भरलेली माहिती यामध्ये तफावत आढळून आल्याने याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडून शाळा स्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती

 त्या अनषंगाने सांगोला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी सुरू झाली आहे. यामध्ये पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची तपासणी पर्ण झाली आहे

 तर सांगोला तालुक्यातील ३८९ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची तपासणी सुरु असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सयोग नवले यांनी सांगितले

चौकट

कोणत्या मुद्द्यांवर होतेय तपासणी

न्यायाधीशांसह पथकाकडून शाळा तपासणीमध्ये प्रामुख्याने वर्गखोल्यांची स्थिती, शालेय परिसर स्वच्छता, मुला मुलीचे स्वच्छतागृहे व त्यांची 

स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळच्या वेळेव्यतिरिक्त शाळेला होणारा उपदवी घटकांचा त्रास, शाळा परिसरातील अवैध व्यवसाय, तंबाखुमुक्त्त शाळा, 

शालेय इमारती व परिसराचा फक्त शैक्षणिक प्रयोजनासाठी उपयोग होतो किवा नाही यासह इतर अनुषंगिक बाबी तपासून वस्तुनिष्ठ अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments