धक्कादायक घटना... उस्मानपुऱ्यातील कॅफे, साताऱ्यातील हॉटेलात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार
छत्रपती संभाजीनगर उस्मानपुण्यातील रॉयल कॅफे आणि सातारा परिसरातील अंश हॉटेलात साताऱ्यातील सतरावर्षीय मुलीवर पंधरा दिवसांपूर्वी ओळख झालेल्या मित्रानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अश्लील चित्रीकरण करून वारंवार आरोपी मुलीला धमकावतही होता. परंतु, अखेर मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला, आईने तिला धीर देत रविवारी (३९ डिसेंबर) सातारा पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.
आरोपी नितीन वाघ (रा. साई पॅलेस, बीड बायपास) विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सोमवारी नितीनला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
शहरात फोफावत असलेल्या कॅफे संस्कृतीचा बोभलस चेहरा समोर अल्प आहे. गेल्या महिन्यात आठ डिसेंबरला क्रांती चौक पोलिसांनी परिसरातील एका कॅफेवर छापा मारला
तेव्हा कपल्स अश्लील चाळे करताना आढळले होते. या वेळी गर्भनिरोधकाचे साहित्यही सापडले होते. त्यामुळे कॅफेमध्ये नेमके काय उद्योग चालतो हे स्पष्ट दिसले होते.
मात्र, रविवारी सातारा ठाण्यात दाखल तक्रारीवरून कॅफेती बाकाराचा प्रकार समोर आला आहे. साता-यातील अल्पवयीन मुलीवर उस्मानपुन्यातील रॉयल कॅफेमध्ये २ डिसेंबर रोजी मित्राकडूनच बलात्कार करण्यात आता
दुपारी दोन वाजता त्याने जुने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत रोहिणीला (नाव बदलले) बोलावले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
उस्मानपु-यातील पहनेपूर्वी २० नोव्हेंचर रोजी फिरायला जाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा आरोपी नितीनने रोहिणीला साता-यातील अंश हटिलवर नेत बलात्कार केला होता. या वेळी तिचे अश्लील चित्रीकरणही केले होते.
ते समाज माध्यमांत व्हायरल करण्याची वारंवार धमकी होता. अखेर रोहिणीने आईला घडलेली कैफियत सांगितली, आनि रोहिणीसह रविवारी सातारा ठाणे याच्याविरोधात तक्रा सोमवारी न्यायालयात हजर होते.
मैत्रिणीमुळे ओळख, पंधरा दिवसांत विश्वास पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत असलेली रोहिणी ७ नोव्हेंबर रोजी मैत्रिणीसोबत अभ्यासिकेत अभ्यास करत होती. तेव्हा मैत्रिणीचा मित्र नितीनसोबत तिची ओळख झाली.
या वेळी नितीनने रोहिणीचा मोबाइल क्रमांक मिळवला व त्यांच्यात संवाद वाढला, मैत्रिणीसह रोहिणीला नितीनने स्वतःच्या घरी अभ्यासासाठी १९ नोव्हेंबरला बोलावले. तिथे नितीनने रोहिणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे प्रकरण माफी मागून मिटवले,
मात्र, समजूत घालवण्याच्या बहाण्याने नितीनने तिला २६ नोव्हेंबरला फिरायला जाऊ, असे सांगत बोलावले, परंतु नितीनने रोहिणीला फिरायला न नेता बळजबरीने साताऱ्यातील हॉटेलवर नेत अत्याचार केला.
0 Comments