google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना माणगंगा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Breaking News

सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना माणगंगा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

 सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे


यांना माणगंगा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी सांगोला यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

 केलेल्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार व माणगंगा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व सांगोला तालुक्यातील पहिले एम.एस. सर्जन डॉ. अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना माणगंगा परिवाराचा

 पहिला  माणगंगा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. २६ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता एमबीएम मॉल, सांगोला येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास डॉ.डी. वाय.पाटील 

विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

 सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला पहिला अतिदक्षता विभाग, पहिलं सीटी स्कॅन सेंटर, पहिलं सोनोग्राफी सेंटर, पहिलं डायलिसिस युनिट,

 पहिलं सुसज्ज ऑपरेशन थिएटर डॉ.अमर शेंडे सर यांच्या आनंद हॉस्पिटलमध्येच कार्यरत झालं. आनंद हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं ते पहिलं आयएसओ मानांकन प्राप्त हॉस्पिटल आहे. 

डॉक्टर अमरसिंह शिवाजीराव शेंडे हे आजमितीस सांगोला पंचक्रोशीतील सर्जरी क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जातात. 

कोणत्याही ज्युनिअर सर्जनला आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात. आपत्कालीन परिस्थितीत कौशल्यानं सर्जरी करून हजारो रुग्णांना जीवनदान देणारे 

देवतुल्य डॉक्टर म्ह्णून डॉ.अमर शेंडे यांची वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे.तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, कृषि , वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांचा आधारवड, 

असा त्यांचा लौकिक आहे. तरी या कार्यक्रमास सांगोला तालुका व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे माणगंगा परिवाराच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments