हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथे तहसीलदार यांना विविध विषयावर निवेदन सादर
सांगोला, 21 जानेवारी ( वार्ता.) - हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथे नुकतेच तहसीलदार यांना विविध विषयावर निवेदन देण्यात आले.
यावेळी तहसीलदार यांच्या वतीने अव्वल कारकून जुंधळे साहेब यांनी निवेदन स्वीकारले. यामध्ये तहसीलदार यांना देण्यात आलेली निवेदन खालील प्रमाणे
1. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे देशातील प्राचीन हिंदू धार्मिक स्थळांच्या मुक्ती आणि नवनिर्माणासाठी प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट तात्काळ रहित करावा
2. प्रभू श्रीराम, श्रीराम मंदिर आणि श्रीरामचरितमानस यांच्या विषयी आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईसाठी *श्रीराम निंदाविरोधी कायदा* संमत करावा.
3. श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील देवाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन नोंदी नसणे,
प्रसादाच्या लाडूपासून, गोशाळा, शौचालय, कोट्यावधीच्या अगाऊ रकमा आधी सर्वत्रच बाबतीत अनागोंदी कारभार करणारी
मंदिर समिती तात्काळ बरखास्त करा तिच्या सर्व गैर कारभाराची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी
अशा मागण्यांचे निवेदन सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने, नवनाथ कावळे, विकास गावडे, प्रशांत राजमाने, रमेश देशपांडे, अशोक बंडगर, संतोष पाटणे सर, ऋषी अनुसे, अजय तेली आदी उपस्थित होते.


0 Comments